गौण खनिज उत्खननाच्या एटीएस मोजनी प्रकरणात महसूलच्या नायब तहसीलदार यांच्याकडून टाळाटाळ,तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

गौण खनिज उत्खनन केलेल्या स्थळांची ईटीएस मोजणी करण्यास टाळाटाळ… वरिष्ठांचे आदेश कनिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेईनात नायगांव / प्रतिनिधी ( रामप्...

गौण खनिज उत्खनन केलेल्या स्थळांची ईटीएस मोजणी करण्यास टाळाटाळ… वरिष्ठांचे आदेश कनिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेईनात

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

तालुक्यात परवाना धारकाने उत्खनन केलेल्या गौण खनिज माती व मुरूमाची ईटीएस मोजणी करण्यासाठी पथक गठीत करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश नायगावच्या तहसीलदारांनी महसूलच्या नायब तहसीलदारांना 4  फेब्रुवारी रोजी दिले होते. पण आजपर्यंत आदेशाची दखलच घेतली नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी किती गांभीर्याने घेतात याचीच तहसील कार्यालयात जोरदार चर्चा होत आहे.

अवैध रेतीची वाहतूक व गौण खनिज उत्खनन नायगांव तहसील कार्यालयात अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. कारण यातून महसूलच्या अधिकाऱ्यांची वसूली होत असल्याने कितीही तक्रारी झाल्या, चौकशी अहवाल आले तरी काहीही कारवाई होत नाही. पण चक्क तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रताप नायब तहसीलदारांनी केल्याची चर्चा तहसीलच्या वर्तुळात होत आहे.

तहसील कार्यालयाने नायगांव तालुक्यातील सुजलेगाव येथील गट क्र. २३ मधून गंगाधर महाजन नव्हारे यांना १०० ब्रास त्याचबरोबर गट क्र. ४२ राम गंगाधर कंदकुर्ते यांना १०० ब्रास, अंतरगावच्या गट क्र. ४११ मधून जोगदंड कंन्स्ट्रक्शन नांदेड यांना १०० ब्रास, मेळगाव येथील गट क्र. ५६ मधून नुसरत कंन्स्ट्रक्शन कंपणीला ५०० ब्रास, सोमठाणा येथील गट क्र. ४२१ मधून कल्याण टोल कंपनी नांदेड यांना ५०० ब्रास, कुष्णूर येथील गट क्र. ३८६ मधून दिगांबर ढगे यांना १०० मुरुम उत्खननाची परवानगी देण्यात आली होती तर सातेगाव येथील गट क्र ६५ मधून शेख जलील यांना १०० माती उत्खननाची परवानगी देण्यात आली होती.

वरील सर्वांना मुरुम व माती उत्खननासाठी जेवढी परवानगी दिली होती त्याच्या कित्येक पटीने जास्त उत्खनन करण्यात आले. याबाबत भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी दि.25 जानेवारी 2021रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून तहसीलदार नायगांव यांनी दि.4 रोजी एक आदेश काढून महसूलचे नायब तहसीलदार एन.बी. वगवाड यांचे अधिपत्याखाली समिती गठीत करण्यात आली सदर प्रकरणी ईटीएस मोजणी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. पण तहसीलदारांनी दिलेले आदेश आजही फायलीत धुळखात पडले असल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी किती गांभीर्याने घेतात याची चर्चा होत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group