महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात मागिल काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरुच आहे सुराणा नगर येथील दरोड्याचा तपास लागण्या पुर्वीच बोरजा येथे पुन्हा 3 लाखाची चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना खुले आवाहन दिले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे चोरी, दरोडा, खुन, महिला अत्याचार आदी घटनेत वाढ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील काही ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना नित्यानेच घडत आहेत चोरीच्या घटना पाहता पोलिस रात्री ची गस्त व्यवस्थित पार पाडतात का नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सुराणा नगर दरोडा प्रकरण सोडलेतर जिल्ह्यातील बाकी चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. दरोड्यातील चोरांना ताब्यात घेण्यापुर्वीच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे हद्दीत बोरजा येथे गुरूवारच्या मध्यरात्री चोरटयांनी राजु वानखेडे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील 35 हजार नगदी व 2 लाख 88 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने असा 3 लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी राजू वानखेडे यांच्या तक्रारी वरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजेनाथ मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व स्वान पथकाने काही अंतरापर्यंत माग काढला होता. अवैध धंद्या बरोबरच जिल्ह्यात क्राईम वाढतच चालले असुन गुन्हेगारी रोखण्यासाठी हिंगोली चे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सुराणा नगर सशस्त्र दरोड्यातील आरोपींना घटनास्थळी कुठलाही पुरावा नसतांना स्थानिक गुन्हा शाखा व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी 72 तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल जिल्ह्यातील नागरीकांमधुन कौतुक होत आहे.

COMMENTS