माजलगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १४ मार्च 2021 रोजी च्या होणाऱ्या परीक्षा आयोगाने अचानक रद्द केल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केले आहे.
कोरोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारच्या शिफारशी वरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा दिनांक 10 मार्च रोजी अचानक रद्द केल्या यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निषेध केला. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची मुलं पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेण्यासाठी येत असतात गेल्या अनेक वर्षांपासून हे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात चार ते पाच वेळेस स्पर्धा परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ या सरकारने चालू केला आहे या निर्णयाचा निषेध करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला असे पत्रकाद्वारे विद्यार्थी नेते मनोज फरके यांनी म्हटले लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या महाविकास आघाडी सर येत असतात गेल्या अनेक वर्षांपासून हे विद्यार्थी .

COMMENTS