नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) प्रत्येक नारीला, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या ...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
प्रत्येक नारीला, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला, तिच्या आरोग्य सेवाला आमचा सलाम !
आज जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयायातील रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा नायगांव भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शंकर पा.कल्याण, कृ.उ.बाजार समितीचे संचालक भगवान पा. लंगडापूरे, मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हा संघटक प्रा.जीवन पा. चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हाणमंतराव गुंटूरकर, बाबु सावकार गोरठेकर, संजय गुजलवार आणि उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते .

COMMENTS