*
सावित्रीबाईंचा वसा पुढे नेऊ! सहाय्यक कल्याण आयुक्त माधुरी सुर्वे यांचे मजदूर संघ महिला जागतिक दिनी प्रतिपादन!*
मुंबई दि.८:आजच्या महिला उच्चपदापर्यंत पोहोचल्या आहेत,याचे सर्वस्वी श्रेय क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांना द्यावे लागेल.स्त्रियांना घराबाहेरही पडता येत नव्हते अशा कर्मट काळात सावित्रीबाईंनी त्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली.स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला,हा वसा आपल्याला पुढे न्यावा लागेल,असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त माधुरी सूर्वे यांनी येथे जागतिक महिला दिनी बोलताना केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महिला विभागाच्या वतीने आज मनोहर फाळके सभागृहात जागतिक महिलादिन संपन्न झाला.त्या वेळी माधुरी सुर्वे मुख्य अथिती म्हणून बोलत होत्या.सोशल लिग पूर्व प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आरती देसाईही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने हा जागतिक महिला दिन संपन्न झाला.
माधुरी सूर्वे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या,शंभर वर्षे झाली स्त्रिया आपल्या हक्कासाठी लढत आहेत.प्रत्येक स्त्रिला स्वतःचे असे व्यक्तीमत्त्व असते.काही उच्चपदी पोहोचतात तर काही तुळशी वृंदावनाशी ओंजळ होऊन रहातात.फक्त तिला व्यक्त होता आलं पाहिजे,ती आदर्श माता असते आणि कर्तव्यदक्ष गृहिणीही असते, तिनेच आदर्श पिढी घडवायास हवी!कोरोना काळातील धैर्य त्यांनी असेच जोपावयास हवे,असेही माधुरी सुर्वे आपल्या भाषणात म्हणाल्या.
आरती देसाई म्हणाल्या, आजची स्त्री स्वतःला सक्षम बनवू शकते.परंतु त्यासाठी तिच्यात आत्मविश्वास निर्माण करावयास हवा.
आजच्या स्त्री समस्येवर संगीता राऊळ, मेघना आसबे, प्रियंका परब,वाचनालयाच्या प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी,श्रावणी पवार यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून आयोजिलेल्या या कार्यक्रमाला मुंबईच्या गिरण्यांमधील महिला कामगारांनी आवर्जून उपस्थिती लावली.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन केले.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर,मोहन पोळ,मधू घाडी आदींचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.◆◆ *काशिनाथ माटल****

COMMENTS