---------------------------------------------------------
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील पर्यवेक्षक व समाजसेवक प्रदीप श्रीधर गोलतकर यांची २३ फेब्रुवारी २०२१ रोजी षष्ट्यब्दीपुर्ती झाली व १मार्च २०२१ रोजी ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रॅफीक डिर्पाटमेंट मधुन ३८ वर्ष सेवा करुन सेफ्टी इन्स्पेक्टर या पदावरुन सेवा निवृत्त झाले. याचे औचित्य साधुन "विश्व विजय प्रगती मंडळ" व शिवसेना शाखा लोकमान्य टिळक नगर अंबरनाथ पुर्व,यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्कार सोहळ्याचे आयोजन नगरसेविका सौ. रेश्मा अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारी २०२१ रोजी विश्व विजय सोसायटीच्या पटांगणात भव्य प्रमाणात करण्यात आले.
प्रथम सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर त्यांच्या हितचिंतक माता भगिनीनीं दुतर्फा उभे राहुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांना समारंभ स्थानी सन्मानाने आणण्यात आले. संजीव नायडु यांनी ईशस्तवन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी त्यांची पत्नी सौ. प्रेरणा व मुलगी सौ. प्राची गवस यांनी ६० दिव्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर स्नेहबंधन, विश्वविजय सोसायटी, शिवसेना शाखा लो. टिळक नगर महिला आघाडी, विभागातील प्रतिष्ठीत महिला या सर्व माता भगिनींनी त्यांना ६० दिव्यांनी क्रमशः औक्षण केले. औक्षणानंतर उपस्थित लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. औक्षणाची ६० दिव्यांची संकल्पना सुशिल भोगावकर व सुनिल भोगावकर या बंधुनी सह कुटुंब यशस्वीपणे राबविली
या समारंभास अंबरनाथचे आमदार मा.श्री. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष व अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख मा.श्री. अरविंदजी वाळेकर, मा.श्री.माजी नगराध्यक्ष श्री. विजयजी पवार, नगरसेवक श्री. निखिलजी वाळेकर, श्री. सुभाष साळुंखे सहकुटुंब, ९० वर्षीय सासरे श्री. सहदेव पाटणकर,अंबरनाथ शिवसेना उपशहर प्रमुख निशिकांत राऊत, संजय सावंत, विभाग प्रमुख डावरे सर, भाजपा अंबरनाथचे शहर सचिव नितीन परब, तुषार मोरे, मनिष भोईर इत्यादी मान्यवर शुभाशिर्वाद देण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. अरविद वाळेकर , मा. आमदार डाॅ. बालाजी किणीकर, मा.श्री. विजयजी पवार,ह.भ.प श्री. रामदासबुवा काळे, अॅड.श्री.सुनिल चव्हाण, कु. निहिरा गोलतकर यांनी यथोचित गौरवपर भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा. सौ. अंजली निशिकांत राऊत (शिवसेना कल्याण जिल्हा महिला आघाडी उपसंघटक)यांनी केले. त्यांनी श्री. प्रदीप गोलतकर यांच्या ६० वर्षाच्या जीवन कार्याचा सुंदर लेखा जोखा मांडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री. अजित काळे, शाखा प्रमुख श्री. संतोष जंगम,अरविंद निकम, उपशाखा प्रमुख श्री.संदीप शिंदे, चेतन गवस, पियुष गोलतकर,वेदांत भोईर, आकाश काळे, राजेश नायर, वसंत जंगम, महिलाआघाडी सौ.अंजली शिंदे, सौ. शितल जाधव, स्नेहा भोगावकर यांनी विशेष परिश्रम केले. शेवटी मराठ मोळी सुग्रास, तुप पुरणपोळी व वरण भाताचा सर्वांनी आस्वाद घेतला
मारुती विश्वासराव

COMMENTS