*पिंपळ्यात वृक्षमित्र- संकल्प नवा ग्रुपच्या माध्यमातून पक्षी मित्र उपक्रम*
---
पिंपळा या गावी वृक्षमित्र -संकल्प नवा या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून...
------------------------------------------------
आष्टीःदादासाहेब बन
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे व्हाट्सअपच्या माध्यमातून वृक्षमित्र नवा ग्रुप हा चालू केला आहे,नवीन मित्र स्वतःच्या खर्चातून वृक्ष लागवड करून नवीन संकल्पना तयार होत आहेत,माणूस म्हणून आपण एक समाजच काहीतरी देणं लागतो,यामुळे हा ग्रुप एप्रिल 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात गावातील सर्व तरुण एकत्रित येऊन स्थापन झाला,आणि यातून 1000 झाडाचे वृक्षारोपण करून त्यांना पाण्याची सोय केलेली आहे,या ग्रुप मध्ये सर्व सुशिक्षित तरुण वर्ग तसेच नोकरदार आहेत,वाढता उन्हाळा पाहून वन्यजीव दिन (3 मार्च) चे औचित्य साधून गावात प्राथमिक शाळा,पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,महादेव मंदिर परिसर,गोटमदेव माळरानावर पक्षी अन्न पाणी डबा झाडावर बसविण्यात आले आहेत,या डब्यात पाणी व अन्न ठेवण्याची सोय आहे,पक्षी येऊन दाणे खाऊन आपली तहान भागू शकतात,उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हा उपक्रम राबविला आहे,या ग्रुपच्या या कार्यक्रमाच्या घेण्यामागच्या एकच उद्देश आहे,कि आपण ही आशा पद्धतीने डबा आपल्या दारासमोर झाडावर लटकावला तर पक्ष्यांच्या अन्न पाण्याची सोय होईल व एक पक्षीमित्र म्हणून संदेश जाईल.कारण उन्हाळा लागला आहे,पक्षी वाट पाहतायत,आणि ज्यांना शक्य आहे,त्यांनी असे डब्बे लटकवा,आपण आपल्यासाठी खूप जगतोय,थोडे निसर्ग चक्र टिकवण्यासाठी ही जगूया..
या उपक्रमाचा आदर्श घेऊन गावोगावी असे डबे लावून निसर्ग चक्र व्याह वाचवला पाहिजे,यावेळी उपस्थित समस्त ग्रामस्थ व युवक वर्ग पिंपळा हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS