नायगांव प्रतिनिधी
तालुक्यातील कोठाळा येथील शाहीर के. डी. पाटील बेंबरे यांच्या शिव कलापथक या संचातील कलाकारांनी शासनाच्या वतीने कोरोना जनजागृती कार्यक्रम घेऊन कोरोणा या संसर्गजन्य रोगांचे महत्त्व पटवून दिली असून या कार्यक्रमास विविध गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
कोविड19 कोरोणा हा संसर्ग रोग जगामध्ये थैमान घातला असून त्यापासून आपण कसे जागरुक असले पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शिव कलापथकाद्वारे बिलोली तालुक्यातील बेळकोणी, बिलोली, कुंडलवाडी, रामतीर्थ, खतगाव, पाचपिपळी, आरळी, कौठा, लोहगाव बावलगाव, कासराळी या गावातील ग्रामस्थांना शिवकला पथकाद्वारे वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुवावे, गर्दीत जाणे टाळणे, नाका तोंडाला मास्कचा वापर करणे, सिनेटायझरचा वापर करणे, हातात हात न देता कोरोना पासून मुक्त होण्यासाठी आपला गाव, कुटुंब सुरक्षित रहावे असे महत्त्व सदर पथकातील प्रमुख शाहीर के.डी. पाटील बेंबरे, शाहीर माधव बैलकवाड, यासह शाहीर चंद्रकांत गायकवाड, भिमराव श्रीरामे, सोपान भेदे, गायिका सौ.कल्पना गायकवाड, मारुती काळेवार, दिगंबर कदम, प्रकाश कांबळे या कलाकारांनी कोरोनाचे महत्व पटवून दिले असल्याने सदर गावातील ग्रामस्थांनी या कलेस प्रचंड दाद दिली आहे.

COMMENTS