*सर्वांचीच निराशा करणारा महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प*
*भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया*
महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून समाजाच्या सर्वच घटकांची निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे सुमारे वीस लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’साठी कोणतीही तरतूद नाही तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्यासाठीही काही केले नाही. शेतकऱ्यांना वीजबिल सवलत देण्याबाबत केलेली घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांना भरमसाठ बिले आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या ऐवजी काही सवलत दिली तरीही शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठे बिल राहतेच. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, वादळ, किडीचा प्रादुर्भाव यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही भरघोस पॅकेज या अर्थसंकल्पात नाही.
त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे जबरदस्त आर्थिक फटका बसलेल्या राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकार पॅकेज जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, या सरकारने बारा बलुतेदारांना, रोजंदारीवरील कामगारांना, रस्त्यावरील व्यावसायिकांना आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते – कार्यकर्ते सातत्याने आंदोलने करत आहेत. परंतु, त्यावरील राज्याचा कर कमी करून दिलासा देण्याचे कामही या सरकारने केलेले नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी केवळ 100 कोटी रुपयांची तरतूद करून मराठा समाजाची निराशा केली आहे. इतर संस्था व महामंडळांसाठीही किरकोळ तरतूद केली आहे. एकूणच समाजाच्या सर्व घटकांची निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे.
ते म्हणाले की, आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्यासाठी सतत सबबी सांगणाऱ्या या सरकारने अर्थसंकल्पात विकासकामे म्हणून केंद्र सरकारच्या भरघोस मदतीने चालू असलेले प्रकल्पच सांगितले. जीएसटीसाठीची 14,000 कोटींची रक्कम येणे असल्याचे कबूल केले असून यापूर्वी सांगण्यात येणाऱ्या आकड्यांपेक्षा ही रक्कम कमी आहे. ही रक्कम योग्य वेळेत राज्याला मिळेलच. परंतु, राज्य सरकारने केंद्र सरकार पुरस्कृत रस्ते, सिंचन, मेट्रो अशा योजनांसाठी मिळणाऱ्या खूप मोठ्या निधीचाही कृतज्ञतेने उल्लेख करायला हवा होता. केवळ केंद्र सरकारच्या योजनांच्या भरवशावर विकासाचे दावे करणारा आणि स्वतःचे कोणतेही कर्तुत्व नसलेल्या अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने मांडला आहे.
*(मुकुंद कुलकर्णी)*
*कार्यालय सचिव*
[08/03, 19:36] MahaBJPMedia:
____________________________________________________________________
*कृपया प्रसिध्दीसाठी*
मुंबई, 06 मार्च 2021
*आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात*
*भाजपा राज्यव्यापी जनजागृती करणार*
*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती*
महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते.
भाजपा प्रदेश, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मा. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मा.पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे.
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. चुकीच्या वीज बिलांमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे, या व अशा अनेक मुद्द्यांबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या अभियानात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 20 हजार शक्तिकेंद्रांच्या माध्यमातून 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. कोरोनामुळे आलेले सर्व निर्बंध पाळून हे अभियान राबविले जाईल, असेही मा. पाटील यांनी सांगितले.
कोरोना कालखंडातील स्थिती अतिशय समर्थपणे हाताळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचेही मा. पाटील यांनी नमूद केले.
*(मुकुंद कुलकर्णी)*
*कार्यालय सचिव*
[08/03, 19:37] MahaBJPMedia:
_________________________________________________________________
*कृपया प्रसिध्दीसाठी*
मुंबई, 08 मार्च 2021
*बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी*
*भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन*
बेलापूर (जि. अहमदनगर) येथील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना असून या अपहरणाचे व खुनाचे सूत्रधार व आरोपी यांना पकडून योग्य शासन होण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व सकल जैन समाज महाराष्ट्र यांनीही या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण झाल्यापासून भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने राज्य सरकारकडे याचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रश्नी आवाज उठवला होता. दुर्देवाने या प्रकरणाचा पोलीस खात्याकडून वेळीच योग्य तपास न झाल्याने 7 मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह बेलापूरपासून अवघ्या 10 किलोमीटरवर सापडला. परंतु गेले आठवडाभरापासून तपास करत असलेल्या पोलिस यंत्रणेला या प्रकरणाचा छडा न लावता आल्याने व्यापारी वर्गात, समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या अपहरणकर्त्या गुन्हेगारांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा व जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने बुधवार दि. 10 मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे ललित गांधी व संदीप भंडारी यांनी जाहीर केले आहे.
यावेळी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक व्यापारी बंधुंनी व जैन समाजाने सामील व्हावे तसेच दिवसभर काळ्या फिती लावूनच कामकाज करावे, असे आवाहन करण्यात आले असून आंदोलनाच्या वेळी कोविडसंदर्भातील शासकीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*(मुकुंद कुलकर्णी)*
*कार्यालय सचिव*uh
[08/03, 19:37] MahaBJPMedia: ...

COMMENTS