*महीलांनीच महिलांचा सन्मा_न करावा:-अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी*
सोनपेठ/प्रतिनिधी
सामाजिक परीवर्तनाच्या काळात महिला या पुरूषाच्या बरोबर सर्वच क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.परंतु महीलांना आणखीही पुर्णपणे स्वातंञ मिळालेले नाही.चुल आणी मुल या संकल्पनेला छेद देवून महिलांनी महिलांचाच सन्मान करावा.असे प्रतिपादन अप्पर तहसीलदार गिरी यांनी केले.
महिला जागतीक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती अंतर्गत तालूका अभियान कक्षाने अयोजीत केलेल्या कार्यक्रमात गिरी बोलत होत्या.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून महासमद्धि महीला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला.मुलगा आणी मुलगी यांना समान संधी दिल्या तर समाजातील दरी संपेल व एक नवीन पांयडा पडेल अशी माहिती गिरी यांनी दिली.यावेळी व्यासपीठावरुन बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की,जागतीक दिनाचे खुप महत्व आहे.महिलांनी आपला हक्क मिळवून घेण्यासाठी खुप मोठा लढा दिला आहे.त्यामुळे महीलांनी घरात रडत बसण्यापेक्षा लढत बसले पाहीजे.उपस्थित महीलांना सावित्रीचे उदाहरण देवून ते म्हणाले की स्त्रियांनी आपले नाव कमावण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.इतिहासकालीन महीलांनी महापुरूष घडविले म्हणुन आज माता रमाई माता भिमाई माता जिजाई यांचा सन्मान केला पाहीजे महीलादिनाचे औचित्य साधून कार्यक्रमात बोंदरगाव,लासीना निमगाव,थडीउक्कडगाव,धामोण,विटा येथील समुहांना एकेवीस लाख रूपयाचे मंजुरी पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सदर कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक राजेश रहाटे,हावळे,श्रीमती आंबेगावकर उपस्थित होते कार्यक्रमात चौथरा शिंदे,जनाबाई खडके,गंगासागर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक तालुका अभियान व्यवस्थापक बाबासाहेब हिरवे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रदिप हरनावळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम शेख,स्वप्नील पोतदार,विलास चव्हाण,अंकुश रसाळ,विशाल चौरे,किरण राठोड यांनी परिश्रम घेतले.उपस्थित महीला व मान्यवरांचे आभार सुवर्णा साकला यांनी मानले.

COMMENTS