नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे विविध महिलांनी गावभर प्रभात फेरी काढून हनुमान मंदिर सभागृहात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांची उधळण केली.
महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. ज्योती देशमुख ,तर सौ. पदमीनबाई तुमवाड, लक्ष्मीबाई बोरबाड, बचत गटाच्या नेतृत्वकार सौ. ज्योती रामदास सुर्यकार, कु. दिप्ति आईलवार व गावातील महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या नावासह स्त्रीशक्तीचा जागर करीत गावभर प्रभात फेरी काढून हनुमान मंदिर सभागृहात उपस्थित गावकर्या समोर देशातील कर्तबगार महिलांच्या कार्यांचा विचाराची उधळण अनेकांनी या प्रसंगी व्यक्त केली असून कॉम्रेड देवराव आईलवार म्हणाले की, देशातील महिलावरील विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत असताना ते आपण कसे हाताळले पाहिजे यावर त्यांनी आपली भूमिका विशद केली, तर सरपंच सौ. ज्योती देशमुख यांनी आपले मत मांडताना म्हणाल्या की, आपण सावित्री मातेचा प्रगल्भ त्याग व संघर्ष यामुळेच घडलो हे नाकारता येणार नाही, मी आज सुजलेगाव नगरीची प्रथम नागरिक म्हणून आहे ती केवळ सावित्री मातेच्या आदर्श यामुळेच आहे म्हणून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला असून या सदर कार्यक्रमास कॉम्रेड देवराव आईलवार, दिगंबरराव जाधव, गोदावरी बाई नवारे, जिजाबाई देशमुख, गायिका पूजा आईलवार, बाबू सुर्यकार, गंगाधर वाघमारे, शाहीर साहेबराव सुर्यकार व गावातील नागरिक महिला पुरुष यांची उपस्थिती होती.

COMMENTS