नांदेड येथील खुरगाव येथे किड्स किंग्डम पब्लिक स्कूल मध्ये पालकांनी यावर्षीची फीस 2020 ते 21 कमी करण्यासाठी आंदोलन केलं याबद्दल सविस्तर वृत्तांत असा की नांदेड शहरातील नामांकित शाळा म्हणून नावारूपाला आलेली किड्स किंगडम शाळा ही , यावर्षीची शैक्षणिक फीस संपूर्ण वसूल करत आहे कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे संपूर्ण शैक्षणिक फीस भरणे शक्य नाही पालकांनी या अगोदर देखील शाळेला विनंती केली होती की फीस कमी करण्यात यावी मात्र शाळेच्या प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केलं पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येऊन आज आज मंगळवारी शाळेच्या समोर आंदोलन केलं
विशेष बाब म्हणजे शाळा प्रशासनाने पालकांना शाळेच्या गेट मध्ये सुद्धा येऊ दिलं नाही संबंधित शिक्षकांना संबंधित पालकांचे निवेदन घेण्यासाठी एकही जबाबदार व्यक्ती पुढे आला नाही पालकांनी सामंजस्य पणाने निवेदन शाळेतील एका व्यक्तीकडे देऊन या ठिकाणी आपला रोष व्यक्त केला या वर्षीच्या कोरोना परिस्थितीमुळे सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे त्यामुळे संपूर्ण पीस भरणे शक्य नसल्या कारणाने 50 टक्के फीस आम्ही देतो असं पालकांचे मत आहे मात्र या बाबतीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित पालकांशी चर्चा न करता पालकांना गेट वरूनच परत पाठवल्यामुळे पालकांमध्ये शाळा प्रशासनाच्या बाबत रोष दिसून आला प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांचे नाव लिहून माझ्या पाल्याची फीस 50 टक्के करण्यात यावी म्हणून असे निवेदन दिल
आवाज उठवणाऱ्या पालकांना हाताशी धरून वेगवेगळे आमिष दाखवत असल्याची चर्चा, पालकांमध्ये होती या बाबतीमध्ये देखील पालकांमध्ये उलटसुलट चर्चा होती शाळा प्रशासनाने असा भेदभाव करायला नको असं पालकांचे मत होतं
addComments
टिप्पणी पोस्ट करा