*
*शिवसैनिकांनी केला आनंदोत्सव साजरा*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ येथील ज्येष्ठ शिवसैनिक भगवान पायघन यांची शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.मागील तालुकाप्रमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ही निवड करण्यात आली आहे.शिवसैनिकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून या निवडीचे स्वागत केले असून मागील अनेक दिवसांपासून सोनपेठमध्ये शिवसेनेचे कार्य घराघरात पोहोचत नसल्याने जुन्या शिवसैनिकांना शिवसेना पक्ष आहे का?असा प्रश्न पडत असल्याने शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या विश्वासातील भगवान पायघन यांची सोनपेठच्या शिवसेना तालुकाप्रमुखपदी निवड करण्याची शिफारस शिवसेना पक्षनेतृत्वाकडे केली होती.या शिफारशीवरून भगवान पायघन यांची निवड करण्यात आल्याचे समजते.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे प्राबल्य पूर्वीपेक्षा कमी झाल्याने शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचले नाहीत का?असेही मानल्या जात होते.अशातच सोनपेठला खमक्या तालुकाप्रमुखाची गरज लक्षात घेता यापूर्वी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख,सर्कलप्रमुख,बूथप्रमुख,शाखाप्रमुख अशा विविध पदाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे भगवान पायघन यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आल्याने ग्रामीण भागात शिवसेना पक्षाला आलेली मरगळ दूर होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.सदर निवडीचे स्वागत शिवसेनेचे खासदार संजय जाधव,संपर्कमंत्री शंभूराजे देसाई,माजी आमदार मीरा रेंगे,हरिभाऊ लहाने,जिल्हाप्रमुख सुरेश ढगे,जिल्हाप्रमुख विशाल कदम,उपजिल्हाप्रमुख,मधुकर निरपणे,रंगनाथ रोडे,रवींद्र धर्मे,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,जनार्धन झिरपे,यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.

COMMENTS