नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंबुलगा नगरीचे भूमीपुत्र सहशिक्षक रमाकांत मोतेवार यांची शैक्षणिक क्षेत्रातील उच्च कामगिरी आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साई सिल्वर ओक लान्स वॉटर पार्क शिर्डी येथे सपत्नीक दि.७ रविवार रोजी सहशिक्षक रमाकांत मोतेवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दरड , विशेष प्रमुख उपस्थिती माजी खा. बिर्गेडियर सुधीर सावंत ,प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांची होती, सहशिक्षक रमाकांत मोतेवार यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदनाचा व शुभेच्या चा वर्षाव होत आहे.रमाकांत मोतेवार यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी पाटील अंबुलगेकर, अंबुलगा नगरीचे प्रतिष्ठित व्यापारी बाबु सावकार उलीगडे , व्यंकटराव कल्याणपाड सर, विठ्ठलराव बाबुराव कल्याणपाड,सतीश मोतेवार, पत्रकार विठ्ठल कल्याणपाड,
गजानन गडदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


COMMENTS