पिंपरी (दि.1 मार्च 2021) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसकमिटीच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. मंगळवार, दि. 9 मार्च 2021 रोजीदुपारी 1 वाजता गांधीभवन तन्ना हाऊस, मॅजेस्टिक कामगार निवासच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा मुंबई येथे ही बैठकहोणार आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी, माजी खासदार, आमदार, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार, सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, सर्व आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच सर्व विभाग व सेलचे जिल्हाध्यक्ष यांनीच उपस्थित रहावे. तसेच राज्य सरकारने कोरोना कोविड-19 विषयी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे,अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
-----------

COMMENTS