नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
येथील प्रसिद्ध दैवत हजरत सय्यद खाकीशहावली रहेमतुल्ला अलैह दर्ग्याच्या संदल (उर्स) निमित्ताचे औचित्य साधून दि 28 फेब्रुवार 2021 रोजी बीबी फातेमा महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात उपस्थिती लावत रामतीर्थ ठाण्याचे सपोनि महादेव पुरी रक्तदान केले.त्यांच्यासह इतर 33 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.
पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध तथा भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नरसी ता. नायगांव येथील हजरत सय्यद खाकीशहावली रहेमतुल्ला अलैह दर्गाहचा संदल (ऊर्स) विविध कार्यक्रमांची दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.पण यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या परिस्थितीला पाहून मिरवणूक व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले.परंपरागत दर्ग्यावर चादर चढवून फातेहाखाणीचा कार्यक्रम पार पडला.अडचणीत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे,एखाद्या व्यक्तीचे जीव रक्तामुळे वाचावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे या उद्देशाने येथील बीबी फातेमा महिला मंडळाच्या अध्यक्षा सय्यद खतीजाबी इस्माईल यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून दिनांक 28 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन नरसीचे पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बिबि फातेमा महिला मंडळाच्या अध्यक्षा सय्यद खतिजाबी इस्माईल,सचिव सय्यद यास्मीनबेगम जाफर, सय्यद सबिया यासिन,सय्यद नजीरा रहेमान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात आपली उपस्थिती लावत रामतीर्थ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी रक्तदान केले व महिला मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, अल्पसंख्याक सेलचे सय्यद इसाक, चेअरमन मारोती पाटील भिलवंडे,माजी चेअरमन गजानन पाटील भिलवंडे,पोलिस जमादार शिंदे,देवीदास बुक्के,डी.बी.पाटील भिलवंडे,संदीप जाधव साईनाथ अक्कमवाड यांनी देखील या उपक्रमास भेट देत महिला मंडळाच्या समाज उपयोगी कार्याचे तोंडभरून कौतुक केले.यावेळी 33 रक्तदात्यांनी रक्तदान करून या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.रक्तदान शिबिरात दि क्रेसेट फाउंडेशन द्वारा संचालित दि क्रेसेट ब्लड सेंटर ब्लड कंम्पोनट लॅब नांदेड येथील डॉक्टर प्रकाश कनकदंडे,कैलास वाघमारे,गणेश चौधरी,शेख,आकाश चिंदालिया,उध्दव मुळे,सतीश बोडे,निकेश राठोड यांच्यासह त्यांची टीम यावेळी उपस्थित होती.

COMMENTS