धर्माबाद (बी.पी.कुदाळे)
बाभळी बंधाऱ्यातील जमा झालेल्या पाणीसाठ्यातील 0.60 टि. एम. सी.पाणी तेलंगणात सोडण्यात आले.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्रिस्तरीय समितीच्या उपस्थित दि. 01 मार्च रोजी पाणी सोडत आले.
आज रोजी बाभळी बंधाऱ्यातील असलेल्या पाणी साठ्यातील 0.60 टीएमसी पाणी सोडल्यास 0.39 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.( म्हणजे जवळ जवळ एक टीएमसी पाण्यातून साठ टक्के पाणी जाणार) पाणी पातळी तीन मीटरने खाली जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनिल पडवळ यांनी दिली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दि. एक जुलै रोजी सर्व 14 गेट वर उचलले जातात, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सर्व 14 गेट खाली सोडले जातात, तेलंगणा तील पोचम पहाड (श्रीराम सागर)धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बाभळी बंधारा असल्याने त्या पाणी साठ्यातील दि. 01 मार्च रोजी0.60 पी एम सी पाणी सोडले.
तिन्ही घटनेच्या वेळी केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचे जल आयोगाचे कार्यकारी अभियंता त्रिस्तरीय सदस्य म्हणून उपस्थित राहावे असा निर्णय आहे.
केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवासराव, महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे ( नांदेड पाट बंधारे विभाग उत्तर), तेलंगाना श्रीराम सागर (पोचमपाड) चे कार्यकारी अभियंता एन. व्यंकटेशराव ,
सचिन देवकांबळे क. अभियंता, एस .जी. शिंदे क.अभियंता, आर. के. मुक्कावार क.अभियंता गुडेवार एल. जी .विजत्रंत्री ,डि.एल.पांडे साहेब, मसूद भाई, गुंजकर पोलीस कर्मचारी महावितरण कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
आज चार महिन्याचे पाणी जमा झालेला मूल्यवान पाणी साठ्यातून 0.60 टिएमसी पाणी सोडत असल्याने लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वेदना होत आहेत.
महाराष्ट्र शासन सतत सात वर्षापासून हे पाणी जमा करतात आणि सोडतात परंतु या पाणीसाठ्याचा उपयोग करण्यासाठी नियोजन करत नसल्याने जलसाठ्याचे महत्त्व शासनाला समजत नसेल का ?असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
असेच चालत राहिले तर बाभळी बंधाऱ्याचा उपयोग काय असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.

COMMENTS