सोनपेठ/प्रतिनिधी शेळगाव येथील तरुण शेतकऱ्याने शेतीत आलेल्या नैराश्यातुन विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्य...
सोनपेठ/प्रतिनिधी
शेळगाव येथील तरुण शेतकऱ्याने शेतीत आलेल्या नैराश्यातुन विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतीत आलेले नैराश्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर बळी घेत आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथील तरुण शेतकरी रामभाऊ नागोराव गोरवे वय २३ याने दि.२२ रोजी शेती व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे नैराश्यातुन व कर्जबाजारीपणा मुळे विष प्राशन केले . त्याला अधिकच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यान दि.२४ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परीवार आहे .

COMMENTS