केज बसस्थानकात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा." "शासनाचे सर्व नियम धाब्यावर"


केज ! प्रतिनिधि

केज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पाश्र्वभूमीवर, सध्या सोशल डिस्टंन्सींगचा पुरता फज्जा ऊडालेले चित्र पहायला मिळत आहे, याकडे संबंधीत यंत्रणेने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे,

सध्या बिड जिल्हयामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या महामारीने डोके वर काढले आहे, या पाश्र्वभूमिवर शासनाने काही नियम जनतेला पाळण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत, यामध्ये, मास्क वापरणे बंधनकारक, सोशल डिस्टंन्सींग ठेवणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी न करणे, गर्दीत न जाणे, हे नियम पाळायचे आहेत, जेणेकरून कोरोना संक्रमण होणार नाही, परंतू याचे गांभिर्य कोणालाच नाही, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाचे गांभिर्य न घेता सर्व नियमाला जाणूनबुजून हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र केज बसस्थानकामध्ये दिसून येत आहे, सध्या पहायला मिळत आहे,केज बसस्थानक हे लातूर ते बिड महामार्गावरील अतिशय वर्दळीचे व रहदारीचे ठिकाण आहे, येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी भरपूर असते ,त्यामुळे संबंधीत एसटी प्रशासनाने, संबंधीत यंत्रणेने, प्रवाशांना वारंवार सुचना देणे गरजेचे आहे, शासनाचे नियम अला ऊन्सींग करून सांगणे गरजेचे आहे, तरीही या ठिकाणी याकडे लक्ष देवून कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करने गरजेचे आहे ,असे सर्वसामान्यातून बोलले जाते.

टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
कलाविश्व आणि त्याचे महान नायक: जगप्रसिद्ध चित्रकार- प्रा.राजेश सरोदे.
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज