*पोहंडुळ रेती घाटावर जलसमाधी आंदोलन करुनही रे=ती
*नियमबाह्य वाळू उपसा थांबविण्यासाठी शेतकरी झाले होते आक्रमक!प्रशासनाने नाचवले कागदी घोडे*
सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
पोहंडुळ येथील रेती घाट लिलाव अधिकृतपणे सुटला असला तरीही शासन नियमाला धाब्यावर बसवून या रेती घाटातुन नियमबाह्यपणे वाळू उपसा सुरू असल्याच्या कारणाने पोंहडुळ येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक पावित्रा घेतला होता.यात शेतकऱ्यांचे होणारे जलसमाधी आंदोलन प्रशासनाच्या तोंडी फेस आणून प्रशासनाची नाचक्की होत असल्यानेच तालुका प्रशासनाने कागदी घोडे नाचवून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला खरा!मात्र रेतीघाट अद्यापही सुरूच आहे.सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पोंहडुळ येथील रेती घाटावरील गोदापात्रात उतरून येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनास सुरुवात केली होती.या संदर्भात शेतकर्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही सोनपेठ तहसीलदार यांना लेखी स्वरूपात दिले होते.मात्र तहसील प्रशासनाने भूमी अभिलेख कार्यालयास सदर रेती घाटाची मोजणी करून देण्याचे लेखी पत्र दिले होते.त्यासोबतच रेती घाटाचा पंचनामा करुन मोजणी होईपर्यंत रेती घाट बंद करण्याचे आदेशही तहसील प्रशासनाने दिले होते.यात रेती घाट बंद ठेवणार असल्याचे देखील रेतीघाटधारक रविकांत पंडीत यांच्या प्रतिनिधींनी कळवले होते.मात्र पंचनामा करण्यासाठी आलेल्या गाडीला गोदावरीच्या बाहेर पडल्यानंतर लागलीच हा रेती घाट पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
सदरील वाळूउपसा करण्यासाठी प्रशासनाने १७ फेब्रुवारी रेतीघाटाचा ताबा दिला यात लिलावात नमूद असलेल्या सर्वे नंबर१,२,५,६२,६३,६४ व ६५ प्रमाणे आहे.परंतु सदरच्या मोजणीतील गट नकाशाप्रमाणे नमूद केलेला आहे.मात्र प्रत्यक्षात रेती उत्खनन्न हे आंदोलकर्त्या गटधारक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीत सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.तसेच प्रत्यक्षात गट मोजणी व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने विहित केलेल्या मर्यादेच्या पलीकडे असून सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या नियमाप्रमाणे गटाची एकूण लांबी ४५० मीटर व रुंदी ६० मीटर आणि खोली ०.५० मीटर म्हणजे पावणेदोन फूट आहे.मात्र याच गोदावरीच्या पात्रात सुरू असणाऱ्या रेती उत्खनात १० ते२० फुटाचे खोल खड्डे खांदण्यात आलेले आहेत यामुळे भविष्यात या खड्डयात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संगनमत करुन सदर ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान करण्याचा पायंडा पाडला आहे का?असा सवालही उपस्थित होत आहे.या निवेदनात नमूद करण्यात आल्याप्रमाणे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने तर गेंड्याची कातडी पांघरली आहे का?अशी चर्चा सोनपेठमध्ये होत आहे.संबधित निवेदनधारक शेतकरी नारायण नागोराव जाधव,हरिहर नागोराव जाधव,अनंत शिवाजी जाधव,विठ्ठल बापुराव परडे,पांडुरंग बापूराव परडे,बाबू बापूराव परडे,भगवान बापूराव परडे,गणपत बापूराव परडे यांच्या निवेनामुळे आणि आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कागदी घोडे नाचवून शब्दाची अफरातफर केल्यानेच रेती घाट अद्यापही चालूच असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS