----------------------------------------
प्रतिनिधी/ माजलगांव.
--------------------------------
महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या १९ फेब्रुवारी जयंती आहे त्यापार्श्वभूमीवर सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुस्तकांचे वाचन करून घरोघरी जयंती साजरी करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ,कार्य देशाच्या प्रगती साठी प्रेरणा देणारा आहे. उत्कृष्ट पुस्तकांचे वाचन करून शिवरायांचे कार्य, प्रेरणा आत्मसात करावी हीच खरी जयंती त्यांच्या कार्याला प्रेरक ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्य वाढविण्यासाठी व रयतेला सुखी- समृद्ध करण्यासाठी अठरा पगड जातीच्या शूरवीर मराठा सरदार मावळ्यांच्या साथीने अदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यां जुलमा ,रयतेवर अन्याय करणार्या शाहीना मातीत गाढून स्वतःचे स्वराज्य निर्माण केले.स्वरातील शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय, हक्क मिळुन देणारे व रयतेला स्वताचे राज्य मिळवुन देणारे शिवराय हे जगातील सर्व श्रेष्ठ राजे म्हणून त्यांचा गौरव केला जातोय, मॉसाहेब जिजाऊ यांचे देखने स्वप्न शिवराय यांनी सत्यात उतरलेले होते हा इतिहास स्वराज्यासाठी कदापिही नविसणारणारा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहे तरी सर्व समाजबांधवानी आपली काळजी घेत घरीच राहून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पुस्तकांचे वाचन करून घरोघरी जयंती साजरी करावी असे आव्हान सावता सेनेचे तालुकाअध्यक्ष राम यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS