माजलगांव/प्रतिनिधी
माजलगांव शहरात महावितरणच्या वतीने सुरू असलेल्या सक्तीचा वीज बिल वसुली च्या विरोधात भारतीय जनता पार्टीने महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकले
महावितरणने शहरात तसेच तालुक्यात वीज बिल सक्तीने वसुली सुरू केली आहे. लॉक डाऊन मध्ये वीज न वापरताही अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आले आहे त्याची दुरुस्ती देखील केलेली नाही असे असताना देखील कर्मचारी कुठलाही विचार न करता शहरात तसेच तालुक्यात सक्तीने वीज वसुली करत आहेत.
महावितरणच्या कार्यालयास आज भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले ही टाळी ठोको आंदोलन भाजपाचे भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताईसाहेब मुंडे, भाजपा प्रदेशउपाध्यक्ष खा प्रीतमताई साहेब मुंडे माजलगांव मतदारसंघाचे भाजपा नेते मा. रमेशरावजी आडसकर साहेब* यांच्या नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी मस्के यांच्या सूचने वरुण
यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत ,भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष डॉ अशोक तिडके, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मनोज जगताप,भाजपा शहराध्यक्ष ॲड सुरेश दळवे,मा तालुका अध्यक्ष हनुमान कदम, नगरसेवक विनायक रत्नपारखी, नगरसेवक दीपक मेंडके,ईश्वर खुरपे,ज्ञानेश्वर सरोदे, बाळासाहेब क्षीरसागर, दत्ता महाजन, पवन मोगरेकर, आनंद जगताप,सुशांत जाधवर, नामदेव मुळे,संतोष जाधव, अजीम खान,धोंडीराम जाधव, दत्ता गजमल, जयपाल भिसे, नितीनराव घायतिडक,सर्जेराव पोटभरे,ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब तेलगड,तात्या पांचाळ,अर्जुन तांगडे,विठ्ठल जाधव,राम शिंदे,उमेश जाधव, शुभम भुरकवडे,दत्तात्रय जाधव, पठाण शाहिद खान,विलास सठाणे,शुक्लेश्वर डाके उपस्थित होते.

COMMENTS