शेतकऱ्यांच्या काळजी चे सरकार शेतकऱ्यांना अडचणीत का आणतय ऐन पिकाला पाणी देण्याची गरज असताना करतय लाईट कट भाग ४

केज प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार व सरकार मधील विज मंत्री शेतकऱ्यांना मोठा शॉक देत आहेत . १२ महिन्यातून शेतकऱ्यांना लाईटची गरजच असते तीन ते चा...


केज प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकार व सरकार मधील विज मंत्री शेतकऱ्यांना मोठा शॉक देत आहेत . १२ महिन्यातून शेतकऱ्यांना लाईटची गरजच असते तीन ते चार महिने ति सुध्दा वेळेला मिळत नाही विजेच्या मनावर शेतकऱ्यांना काम करावे लागतात यातही विज ग्राहकांची कुचंबणा होते तर विज कर्मचारी व अधिकारी ग्राहकावरच दादागिरी करतात आणी ऐन पिकांना पाणी द्यायच्या वेळेला विज कट करने व एक दिवसाआड किंवा अडवून विज देणे सारखा अत्याचार विज ग्राहकावर केला जात आहे . 

महाराष्ट्र सरकार तसे शेतकऱ्यांचे जाणता राजाचे सरकार आहे अस बोलल जात , शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या या सरकारला शेतकऱ्यांच्या अडवणुकी बाबतीत काही कस वाटत नाही . शेतकरी  दोन हंगामात पिके घेतात खरीप व रबी हे या सरकरला माहिती असावे अस वाटत , खरीप हंगामात विजेची आवश्यकता लागत नाही जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना माहिती असायला काही हरकत नसावी यानंतर रबी हंगामात पाणी देण्याची आवश्यकता असते शेतकऱ्यांच्या सरकारला माहिती असावे आणी याच बरोबर माहिती असावी की रबी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा विज मिळायला पाहिजे परंतु असंख्य शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते अस म्हणल्या जात की  सहा तास दिली जाते परंतु या सहा तासात लाईट ट्रीप होणे , डि पी जळने , मोटार जळने आदी संकटाचा सामना करत करत सरासरी एक ते दोन तास मोठ्या मुश्किलीन विज शेतकऱ्यांना मिळते . यातही जर सलग दोन तास विज मिळायला लागेल अशी शक्यता निर्माण होताच विज कनेक्शान कट करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना खूप छळल जात आणी विज कर्मचारी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात असा अनेक शेतकऱ्यांचा विज कर्मचाऱ्यांवर आरोप आहे परंतु तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्या शिवाय शेतकऱ्यांच्या हाती काही नाही तक्रार करायला जाव तर जास्त अडवणूक केली जाते आणी पुन्हा त्रास नको म्हणून शेतकरी शांत बसतात. 


संपूर्ण वर्षाचे बील भरून घेणार सलग वीज पण नाही देणार असे आठमुठे धोरण विज मंडळाचे 

होळ सबस्टेशन वरून अनेक गावाना विज जोडणी केलेली आहे यात भाटुंबा , चंदन सावरगाव , कळमअंबा सह आदी गावे जोडलेली आहेत . कळमअंबा , केकतसारणी या गावा बरोबर स्टोन क्रेशरला विज जोडणी सह आदी नंतर जोडल्या गेल्यामुळे भाटुंबा गावचे शेतकरी अरुण धपाटे यांनी याबाबतीत सांगितले की आम्हाला दोन तास सुध्दा लाईट टिकत नाही यातच एक दिवसाआड मध्यंतरी लाईट केली व आता दोन दिवसांत शेतकऱ्यांची लाईट तोडायला निघाले आहेत यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येणार आहेत पिकाच्या ऐन गरजेच्या वेळी जर लाईट देणार नसतील तर विज बील कश्याच मागतात हे असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे . राजकीय हस्तक्षेपातुन व सहाय्यक अभियंता यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचे बोलले जात आहे संपूर्ण वर्षभराचे पैसे भरून सलग चार महिने दोन तास सुध्दा विज मिळत नाही आणी त्यातहि नेमक्या वेळेला विज बंद करून कनेक्शन कट करने म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरल्या सारखेच आहे   . अश्या आठमुठ्या धोरणा बाबतीत लवकरच तक्रार देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group