केज रमेश इतापे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवास सेवा देण्यात येतात.
नागरिकांना अल्पदरात व वेळेनुसार देवदर्शन करता यावे याकरीता एसटी महामंडळ धारूर आगाराकडून सोमवारी बससेवा यात्रास्पेशल सुरू करण्यात आली. केज येथील बसस्थानकातून
आगार प्रमुख शंकर वैजनाथ स्वामी, पत्रकार नंदकुमार मोरे, मजहर शेख, हनुमंत सौदागर,वाहतूक नियंत्रक
एस एफ मस्के,ए व्ही लोंढे,वरिष्ठ लिपिक बी बी बिक्कड चालक बी बी राऊत,वाहक बी एस राऊत आदींच्या हस्ते पूजा करून बस केज येथून मार्गस्थ करण्यात आली.
यात्रेकरुनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख स्वामी यांनी केले.
दर सोमवार सकाळी आठ वाजता धारूर येथून प्रस्थान
मार्ग येरमाळा, पंढरपूर अक्कलकोट मुक्काम
दुसरा दिवस सोलापूर तुळजापूर,अंबाजोगाई परळी वैजनाथ धारूर असा प्रवास करणार आहे.
नागरिकांसाठी ७७५ जेष्ठ नागरिकांसाठी ३९० रुपयांमध्ये तिकीटदर याप्रमाणे सोय करण्यात आली आहे.
केज बसस्थानक व धारूर वाहतूक नियंत्रक यांच्याकडे बुकिंग करता येईल मो श्री मस्के ९५०३२२६३२२,श्रीमती जावळे ७४९९४८२९२८ या क्रमांकावर बुकिंग करता येईल
यात्रेकरू प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS