धर्माबाद:-(अहमद लड्डा)
भारतीय जनता पार्टी , धर्माबाद तर्फे धर्माबाद येथे पानसरे चौक पासून महावितरण कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून भा ज पा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरूद्ध घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.महावितरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात आले.
महावितरण कार्यालयासमोर एक तास भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण व आघाडी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजपा कार्यकर्ता कडून महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कोरोना संकटं काळात वाढीव आलेले विज बिल कमी करून देण्यासंदर्भात धर्माबाद तालुक्यातील कोणाचेही शेतीचे व घरगुती विद्युत कनेक्शन कट केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. तसेच माहीतीस्तव पोलिस निरीक्षक धर्माबाद व तहसीलदार, धर्माबाद यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी रविंद्र पोतगंटीवार भा ज पा जी उपाध्यक्ष नांदेड, राम पाटील बन्नाळीकर ता अध्यक्ष धर्माबाद, साईनाथ शिरपुरे ,संजय पवार, संजय पाटील शेळगावकर, श्याम झंवर,विठ्ठल पाटील चोळाखेकर, अंकित गोदा, अमित मुंदडा ,श्रीनिवास ईनानी, हनुमंत पाटील मोकलीकर, नारायण पाटील रामपूरकर, साईनाथ स्वामी, चेतन घाटे ललेश पाटील मंगनाळीकर , आवार नारायण ,शंकर तुनकेवार, तुकाराम पाटील,हणमंत कत्ते , यलप्पा आकुलवार
भाजपा पादाधिकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS