केज!प्रतिनिधि!
मागच्या दोन दिवसा पूर्वी केजतालूक्यातील सोनेसांगवी१, येथील ७ तरुण शेतकऱ्यांनी ऊस वाहतूकिसाठी रस्ता द्यावा म्हणून आत्मदहनाचा इशारा देवून मा. तहसीलदार केज यांना निवेदन दिले होते, परंतू अजूनपर्यंत या प्रकरणाची कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही, किंवा संबंधीत तहसील प्रशासनाने स्थळ पाहणी सुद्धा केलेली नाही,
न्याय मिळत नसल्याचे पाहून ते सात तरुण शेतकरी रात्रीपासून गायब झाले आहेत, त्यांचे कांही बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालूकाध्यक्ष, मुकुंद कणसे यांनी एका प्रसिध्दि पत्रकाद्वारे केला आहे.
मौजे सोने सांगवी येथील शेत रस्त्याचे प्रकरण गेल्या चार महिन्यापासून तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबीत पडलेले आहे, परंतू तारखा वर तारखा याशिवाय या तरूण शेतकऱ्यांच्या हाती कांहीच मिळाले नाही, परंतू प्रकरण निकाली निघाले नाही, परंतू प्रश्न असा उद्दभवतो कि याचा निकाल का लागत नाही?स्थळ पहाणी का नाही झाली? असे अनेक प्रश्न निर्णाण होतात, मा. तहसीलदार साहेबांनी आजपर्यंत प्रस्तुत ठिकाणी भेट का दिली नाही?प्रकरण शेतकऱ्यांच्या आत्मदहनापर्यंत आले तरी त्याची प्रशासनाला काळजी कशी नाही?
अखेर हे प्रकरण कोणाच्या सांगण्यावरून थांबले आहे?चार सहा महिन्यापासूनचा हा रस्ता मागणीचा विषय गांभिर्याने का घेतला जात नाही?यासारखे एक ना अनेक प्रश्न संबधीत तरूण शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
परंतू शेतरस्ता होणे गरजेचे आहे, कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाला तर संबधीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे हा विषय तात्काळ मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय दयावा, परंतू तहसिल कार्यालयात चार ते सहा सुनावण्या झाल्या आहेत, मार्ग हा तहसीलदार साहेबांनी काढून या तरुण शेतकऱ्यांवर दया दाखवावी. अन्यथा या शेतकऱ्यांचे बरेवाईट झाले तर त्यास जबाबदार कोण, असे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, मुकुंद कणसे यांनी काढलेल्या प्रसिध्दि पत्रकात नमुद केले आहे.

COMMENTS