माजलगाव :सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी १९९२ पासून इयत्ता १ली ते ४थी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागांतील अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून दररोज एक रूपया प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्यामुळे सदरील उपस्थिती भत्ता देण्यात येऊ नये आसे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या २२ फेब्रुवारी २०२१ पत्रकान्वये राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आहेत. त्यामुळे तो आदेश शासनाने मागे घेऊन सावित्रीमाईंच्या लेकींचा उपस्थिती भत्ता तात्काळ सुरू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माजलगाव शाखेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती माजलगाव यांच्या मार्फत ईमेल द्वारे मा.मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष राहुल टाकणार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
शासनाने आपल्या आदेशात असे नमुद केले आहे की, हा भत्ता शाळेत नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी दिला जातो परंतू सन २०२०-२१मध्ये कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे हा उपस्थीती भत्ता या वर्षात बंद करण्यात येत आहे.
वास्तविकतः हा भत्ता मुळातच अत्यल्प असून यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. या प्रोत्साहनपर योजनेमुळे गोरगरीब शोषित वंचित पिडीत वर्गातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत. जर हा भत्ता बंद केला तर त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडण्याची फार मोठी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदयांनीच या बाबीकडे लक्ष देऊन शालेय शिक्षण विभागाला उपस्थिती भत्त्यामध्ये वाढ करून तो सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष भारत टाकणखार, वसंत टाकणखार, तालुका सचिव अभिमन्यु इबिते, किरण शिंदे, निलेश गावडे, रणजित राठोड, नारायण भाळशंकर, अजिमोद्दिन खतीब, धोंडीराम रामुळे, मनोहर कटारे, जीवन डोंगरे, शिवाजी भाळशंकर, किरण माने, सय्यद आयुब, अमित वाघमारे, राजकुमार सोनवणे, कृष्णा हौसरमल, नागनाथ पडलवार, विश्वनाथ बेद्रे, प्रतिक सर्वांनी, नितीन गायसमुद्रे, प्रविण जाधव, शेख असद, सुमेध घाडगे, शंकर पवार, बळीराम घनघाव, शिवाजी व्यवहारे,गोविंद पवार, श्रीकांत जाधव,राजेंद्र सातपुते, मारोती शहापूरकर, नितीन पुटवाड, हनुमंत पांढरपोटे, शेख मतिन, अनिल गावित,लक्ष्मण पोटभरे,रवी आदमाने, विजय वैरागे आदींनी केली आहे.
COMMENTS