केज ! प्रतिनिधी
स्पर्धेतून उद्याची पिढी घडते असे मत उपसरपंच पांडुरंग भांगे यांनी व्यक्त केले ते
तालुक्यातील सातेफळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते. माध्यमिक गट व प्राथमिक गट यानुसार स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या विद्यार्थ्यांना
बालगटातून प्रथम जानवी कांदे,द्वितीय विजय भांगे, तृतीय अभिषेक बोबडे,उत्तेजनार्थ सरस्वती भांगे, सायली भांगे माध्यमिक गटातून प्रथम कुलदीप सोनवणे,द्वितीय अनुराधा मुंडे,तृतीय प्रताप भांगे,उत्तेजनार्थ अमृता बोबडे,चैतन्य घाडगे आदी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह रोख पारितोषिक देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव रघुनाथ घाडगे,उपसरपंच पांडुरंग भांगे,
प्रमुख पाहुणे संजय गांधी निराधार योजना समिती केज तालुकाध्यक्ष बालासाहेब बोराडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळकृष्ण भवर
सारणी चे उपसरपंच भागवतराव सोनवणे,आदींच्या हस्ते पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
रोहीदास नानाभाऊ
इंगोले,श्रीहरी पंडित इंगळे,
दिपक प्रल्हाद घाडगे,
शिवाजी बाबुराव भोगल,
बाळासाहेब नामदेव कांदे
शिवाजी अरूण भांगे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी हनुमंत घाडगे यांनी केले.

COMMENTS