बालाजी बच्चेवार यांचे अविरत जनसेवेचे अप्रतिम कार्य* *साईप्रसाद कदम जुन्नीकर*

धर्माबाद (अहमद लड्डा) नायगाव विधानसभा क्षेत्रात भाजपाचे वरिष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांचे लोकाभिमुख भरीव कार्य असून अविरत जनसेवेचे अप्रतिम क...


धर्माबाद (अहमद लड्डा) नायगाव विधानसभा क्षेत्रात भाजपाचे वरिष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांचे लोकाभिमुख भरीव कार्य असून अविरत जनसेवेचे अप्रतिम कार्यआहे .मतदार संघातील शेतकऱ्यासाठी शासकीय योजनेचे लाभ मिळवून देणे ,शासकीय योजनांची माहिती ध्येयधोरण जनसामान्यापर्यंत पोहोचून जनजागृती करून सतत लोकाभिमुख कार्य करत असतात.

 थकीत शेतीकर्ज खातेदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऋण समाधान योजनेचा लाभ मिळवून दिला .योजनेची माहिती आणि व्याप्ती जनसामान्यांपर्यंत पोहोचली ,बालाजी बच्चेवार साहेब यांचे अविरत जनसेवेचे अप्रतिम कार्य आम्हा नवयुवक कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन भाजपाचे कार्यकर्ते साईप्रसाद पाटील कदम जुन्नीकर यांनी धर्माबाद येथे केले आहे .

बच्चेवार यांनी कोरोना व्हायरस महाभयंकर कालावधीमध्ये त्यांनी जनतेसाठी विविध माध्यमातून सोशल मीडियातून प्रत्यक्ष भेटून अनेकांना मदत केली धीरदीला अनेक गावांमध्ये निर्जंतुकीकरनाच्या फवारण्या करून घेतल्या, स्वच्छतेबाबत विविध शासकीय यंत्रणा आरोग्य विभाग तहसील विभाग यांना जणकार्य करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या निष्कलंकीत नेतृत्वाची परिनीती मतदार संघात अनेकांना आली आहे . निर्भिड, आणि कुशल संघटक म्हणून त्यांची लोकप्रियता सुरुवातीपासूनच कायम राहिलि आहे.

 दुष्काळसदृश परिस्थिती आणि गारपीट मध्ये ,अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शासकीय यंत्रणेला पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यास भाग पाडले सहकार्य केले आहे. लॉकडाऊन च्या काळात अनेक कार्यकर्त्यांच्या अडचणी मध्ये धावून जाणारे श्री बालाजी बच्चेवार साहेब अविरत कार्यरत असतात.

 कार्यकर्त्यांच्या समस्या सोबत शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे नायगाव तालुका निर्मितीच्या आंदोलनात त्यांना कारावासही भोगावा लागला .भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवलेल्या अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला विजयश्री मिळवून दिली प्रस्थापित लोकांच्या साम्राज्यमध्ये भाजपाला फार जनादेश नसतानासुद्धा कठीण काळात पक्षाचा विस्तार ,ध्येय ,धोरण ग्रामीण भागात पोहचवण्याचे कार्य बच्चेवार साहेब यांनी केले हे कोणीही नाकारू शकत नाही. अशा धिरगंभीर संयमी नेतृत्वास त्यांनी केलेल्या अप्रतिम अविरत कार्यास तोड नाही.

 कार्यकर्त्यांन विषयी असलेली आपुलकी जिव्हाळा कार्यकर्त्यांच्या सुखा -दुखात सतत हजर राहणारे ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांचे अविरत आणि अप्रतिम कार्य आम्हा नवयुवक कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादाई आहे. असे मत साईप्रसाद पाटील कदम जुन्नीकर यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group