नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कूल मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त अभिवादन करून विद्यार्थ्यांना मास्कचे पंकज पाटील चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रारंभी विज्ञानवादी संत श्रेष्ठ गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना त्रिवार अभिवादन मा.नगराध्यक्ष विजय भालेराव, दयानंद भालेराव, बालाजी भालेराव, माधव भालेराव, शिवाजी पाटील चव्हाण , माणिक पा.चव्हाण, गोविंद पा. हिवराळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मद्येवाड मामा, जयवंत बेळगे, शेख माजीत, संभाजी पांचाळ, शिवानंद पांचाळ, सचीन फुलांरी, बाळु ईबितवार, माधवराव सोनटक्के, अध्यक्ष कांबळे राजेंद्र संत रविदास महाराज युवा मित्र मंडळ व सदर मित्र मंडळाचे पदाधिकारी
संतोष हवेलीकर, पांडुरंग हवेलीकर, संजय सोनटक्के, नागेश भालके, राजु वागमारे , सदिप बालकेडे , मोहन गंधारे, आमेल दुधबे, साई गंधारे अदि जणांची उपस्थिती होती.

COMMENTS