माजलगाव शहर पोलिस मोटरसायकलनवीन बी.एस.6 मोटारसायकल वाल्यांनी जी.पी.एस.बसुन घ्यावे - पोलीस निरीक्षक धंनजय फराटे यांचे आवाहन


माजलगाव/प्रतिनिधी  

        मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी व चोरीस गेलेल्या मोटरसायकलच्या तपास कामासाठी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मोटर सायकल व वाहन तपासणी मोहीम दि.८ फेब्रुवारी २०२१ सोमवार पासून राबवण्यात येत आहे तेव्हा मोटर सायकल व वाहन मालकांनी आप आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावीत व नवीन बी.एस.6 मोटरसायकल खरेदी केलेल्या आहेत त्यांनीआपल्या मोटारसायकल ला सुरक्षित तेच्या दृष्टीने जीपीएस बसून घ्यावे असे आव्हान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे.

         सध्या स्पर्धेच्या युगामध्ये दळणवळणा साठी वाहनांची संख्या मोटरसायकलची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे या मोटर सायकल चोरीला आळा घालण्यासाठी व चोरी गेलेल्या मोटरसायकल चा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने वाहन तपासणी व मोटारसायकल तपासणी मोहीम दि.८ फेब्रुवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे. तेव्हा या मोहिमेत पोलिसांना वाहनधारकांनी व मोटरसायकल मालकांनी आप आपल्या वाहनांची ची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत किंवा तपासासाठी आणून दाखवावीत त्याचबरोबर नवीन निघालेल्या बीएससीच्या मोटरसायकलच्या किंमती लाखो रूपये झाल्या आहेत तेव्हा सर्व नवीन मोटरसायकल धारकांनी आपापल्या मोटरसायकलला जी.पी.एस .बसून घ्यावे जेणेकरून आपल्या गाडीची सुरक्षितता होईल व गाड्या चोरी जाण्यास आळा बसेल म्हणून शहर पोलीस हा उपक्रम राबवित आहेत .ते जनतेच्या हितासाठी आहेत तेव्हा पोलिसांच्या तपासणी मोहिमेला जनतेने सहकार्य करावे असे आव्हान माजलगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे

टिप्पण्या