माजलगाव/भास्कर गिरी
विद्यार्थ्यानो आधी आपले शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य तयार करा आणि मगच राजकरण करा,राजकारणामध्ये तुरूंनाचा वापर होत असतो त्यामुळे आपले भवितव्याचा विचार करून आपण आपले भविष्य उज्वल करावे असे मत सुंदराराव सोळंके महाविद्यालयात आयोजित संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित संवाद तरुणाई या कार्यक्रमात आ.रोहित पवार बोलत होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ.प्रकाश सोळंके होते तर जि. प. सदस्य जयसिंग सोळंके,ऍड भानुदासराव डक, प्राचार्य डॉ.व्ही.पी.पवार ,प्रा निळकंठ साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती,राजकारनात येण्यापूर्वी तरुणांनी आपली दिशा कोणती आपण काय केले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक असून त्यानुसार आपले भविष्य निर्माण केले पाहिजे शिक्षण घेऊन रोजगार निर्मिती केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेत त्यांना दिलखुलास पणे उत्तरे दिली.विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत चातुर्याने आपले प्रश्न विचारून सामाजिक,शैक्षणिक बाबीवर त्यांचे लक्ष केंद्रित केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की अनुभवी व्यवसायिकांशी चर्चा करा त्यांनी ज्या पद्धतीने व्यवसाय चालवत आहेत त्यानुसार तुम्ही काम करा प्रत्येक क्षेत्रात करिअर होऊ शकते त्यासाठी मात्र मेहनत आवश्यक असते.युवकांनी चौफेर लक्ष ठेऊन परिसरात घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे असे देखील यावेळी म्हणाले.प्रास्ताविकात आ.सोळंके यांनी विद्यालयातील शैक्षणिक बाबी अधोरेखीत करत नवनिर्मानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.तर आभार जयसिह सोळंके यांनी मांडले.
*समाजसेवेसाठी राजकारणात*
एका विद्यार्थ्याने आ.रोहित पवार यांना आपण राजकारणात का आलात ? हा प्रश्न विचारला असता आपण सामाजासाठी क्काही तरी केले पाहिजे आपली सामाजिक देणं म्हणून काही तरी करायचे आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे समाजच्या सेवेचे माध्यम म्हणून मी राजकारणात प्रवेश केला असे उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली.

COMMENTS