कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली – आमदार रोहित पवार

- माजलगाव पत्रकार संघाचे दर्पण, कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण; तुकाराम येवले दर्पण पुरस्काराने सन्मानित  माजलगाव – दि. १६ (प्रतिनिधी) कोरो...


  • - माजलगाव पत्रकार संघाचे दर्पण, कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण; तुकाराम येवले दर्पण पुरस्काराने सन्मानित 

माजलगाव – दि. १६ (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे जग हादरले. अशा वेळी कुटुंब संस्थेचे महत्व अनेकांनी जाणले. प्रत्येक जण आपआपल्या परीने जमेल ती मदत इतरांना करु लागला. कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली. आपले कोरोना वॉरियर्स डॉक्टर, सरकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, पोलिस यंत्रण यांनी केलेल्या कार्याचे महत्व जाणून माजलगाव पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जामखेड-कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केले.

मुंबई पत्रकार परिषद संलग्न माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी दि. १६ रोजी आयोजित केलेल्या दर्पण, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पवार, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, भाजप नेते रमेश आडसकर, नगराध्यक्ष शेख मंजूर, आदी उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, आमदार प्रकाश सोळंके यांना आमदारकीचा अनुभव दांडगा आहे. विधानसभेत सेशनमध्ये काही अडचण आली तर आम्ही नवीन आमदार तर त्यांचे मार्गदर्शन घेतोच परंतु ज्येष्ठ आमदारही अनेकदा प्रकाशदादांचे मार्गदर्शन घेतात. कोरोना काळात अनेकांनी फु ल ना फुलाची पाकळी म्हणून इतरांना मदत केली. आज पत्रकार संघाच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यात आला. परंतू हजारो लोक ज्यांनी आपली पर्वा न करता अनेकांची मदत केली आहे. आज जे इथे उपस्थित नाहीत अशा सर्वच कोरोना वॉरिअर्सचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापूर्वी सुप्रियाताई, अजितदादा या कार्यक्रमासाठी आले होते. आज मी या पत्रकार संघाच्या कार्यक्रमास आलो आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल असे आमदार रोहित पवार म्हणाले.

भाजप नेते रमेश आडसकर यांच्या भाषणाचा उल्लेख करुन आमदार रोहित पवार म्हणाले की, पवार घराण्याच्या राजकीय वारशाचा फ ायदा मला नक्कीच झाला. मी मतदारसंघ निवडत असताना मी असा मतदारसंघ निवडला की मी जिथे निवडून येईल का नाही हे न पाहता मला त्या मतदारसंघात काम किती करावे लागेल याचा अभ्यास मी प्रथम केला. आणि नंतर मी जामखेड कर्जत मतदारसंघातून निवडून आलो. प्रत्येक कार्यक्रमातील भाषणाचा बारकारीने अभ्यास आम्हाला करावा लागतो. कोरोनाच्या काळात मी लोकांची कामे करण्यात व्यस्त होतो. राजकारणात आपण दुय्यमस्थानी आणि लोक प्रथमस्थानी असावेत. माजलगाव तालुक्यात दोन कोटी पेक्षा जास्त मदत कोरोना काळात झाली ही सर्वात मोठी बाब आहे. आज माजलगाव पत्रकार संघाने खर्या् कोरोना वॉरिअर्सचा सन्मान केला आहे. ज्या पध्दतीने आपण सर्व जण एकत्र आला आहात अशाच पध्दतीने तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या असे आवाहन रोहित पवार यांनी केले. यावेळी बोलताना आमदार सोळंके म्हणाले कि, माजलगाव पत्रकार संघाने तुकाराम येवले यांचा दर्पण पुरस्कार देऊन गौरव केल्याने खर्या अर्थाने त्यांच्या पत्रकारितेचे सार्थक झाले आहे. पत्रकारिता करताना पत्रकारांना येणाऱ्या समस्या सोडविण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन असे आश्वासनही आमदार सोळंके यांनी यावेळी बोलताना दिले.--------------------- 

दर्पण पुरस्काराने तुकाराम येवले गहिवरले

माजलगाव पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार तुकाराम येवले यांना आज दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने तुकाराम येवले यांना अश्रु अनावर झाले. हा पुरस्कार आपण आई-वडिलांना समर्पित करतो असे सांगून तुकाराम येवले यांना गहिवरुन आले

-------------------------------

आडसकर, सोळंकेत जुगलबंदी 

माजलगाव पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला भाजप नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके एकच व्यासपीठावर आले तेंव्हा त्यांच्या भाषणातून एकमेकावर चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले. दोघांनीही एकमेकांची उनेदुनी काढत चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. 

या कोरोना योद्धयांना मिळाले पुरस्कार

डॉ. सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख, टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर.

 या कार्यालयाला कोरोना योद्धा विशेष सन्मान 

नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे या कार्यालयाला कोरोना योद्धा वेशेष सन्मान देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव तर, सूत्रसंचालन पांडुरंग उगले यांनी केले. कार्यक्रमाल मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group