राम दातीर माहूर (प्रतिनिधी )मुंबई येथील रूग्णालयात उपचार घेत असलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत पाटील यांच्या उत्तम स्वास्थ्य...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )मुंबई येथील रूग्णालयात उपचार घेत असलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत पाटील यांच्या उत्तम स्वास्थ्य लाभासाठी माहूरचे शिवसैनिक सुरेश आराध्ये यांनी दि.6 जून रोजी श्री देवदेवेश्वर मंदिरात अभिषेक करून श्री दत्त प्रभूला साकडे घातले.
मागील आठवड्यात खा.हेमंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबई येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून तशा आशयाचा संदेश सामाजिक माध्यमांतून त्यांनी शिवसैनिकांसह आपल्या चाहत्यांना दिला आहे.

COMMENTS