मस्साजोग प्रतिनिधी-
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी बाबुराव पांडुरंग दळवे यांची परभणी येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अधिक माहिती अशी की बाबुराव पांडुरंग दळवे यांनी तलाठी पदावर असताना केज तालुक्यातील,नांदुरघाट,बानेगाव, शिरूर घाट,तांबवा,बनसारोळा इत्यादी गावांमध्ये उल्लेखनीय कार्य व सेवा केल्या बद्दल त्यांना 2005 मध्ये स्व.अरोग्यमंत्री डाॅ विमलताई मुंदडा यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते व मंडळअधिकारी पदावर असताना धारूर, अंबाजोगाई, युसुफ वडगाव येथे मंडळअधिकारी म्हणून चांगली सेवा केल्या बद्दल बाबुराव पांडुरंग दळवे यांना 2015 मध्ये मा. नवलकिशोर राम. जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते आदर्श मंडळअधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते व त्यांनी विविध पदांवर एकुण तीस वर्षे चांगली सेवा केल्याबद्दल प्रशासना कडून बाबुराव पांडुरंग दळवे यांची नायब तहसीलदार म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली त्या बद्दल मस्साजोगचे पत्रकार अनंत जाधव,मंडळअधिकारी जी,पी, नन्नवरे साहेब,बी,ए,फरके साहेब,एफ ,एस,हांगे साहेब ,बी,बी पवार साहेब, तलाठी डि ,एम मस्के साहेब, सामाजिक कार्यकर्ते लतीफ पठाण यांच्या हस्ते बाबुराव पांडुरंग दळवे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा