*उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके,गटविकासअधिकारी सचिन खुडे यांचे योगदान*
सोनपेठ/प्रतिनिधी
परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने व सोनपेठ पंचायत समितीच्या संयोजनातून प्लास्टिकमुक्त सोनपेठ तालुका करण्यासाठी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी योगदान दिले असून घरोघरी जाऊन प्लास्टिक किती धोकादायक आहे याचे नाट्यरूपी प्रात्यक्षिके सादर करत प्रत्येक गावात प्लास्टिक गोळा करत ती प्लास्टिक नष्ट करण्यासाठी खुडे परिश्रम घेत आहेत.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायत कोरटेक येथे प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली होती.यामध्ये साडेसहा प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला यावेळी सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.माझी वसुंधरा अभियान तथा पर्यावरणमुक्त भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण करत निरोगी जीवनाचा मंत्र आणि मंत्र सांभाळून कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.कैलास घोडके यांनी प्लास्टिक गोळा करून ग्रामस्थांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा व वसुंधरेचे रक्षण करून येणारी पिढी निरोगी सुदृढ,सशक्त,निर्माण करण्याचा संदेश दिला.त्याचबरोबर शौचालयाचा नियमित वापर करा आणि निरोगी राहण्याचा कानमंत्रच उपस्थितांनी ग्रामस्थांना दिला आहे.यापुढे प्लास्टिक न वापरण्याची शपथ देण्यातही आली यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.कैलास घोडके सोनपेठचे गटविकास अधिकारी सचिन खुडे,महिला व बालविकास अधिकारी कदम,जिल्हा परिषद सदस्य दशरथ सूर्यवंशी-पाटील,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक भोसले,ग्रामसेवक पवार अंगणवाडी पर्यवेक्षिका सोळंके,बी.आर.सी.संतोष मुडे,अमोल गांगर्डे,विजय प्रधान,ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS