उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर. प्रा. सुरेश पुरी यांना पत्रकार संघाचा जीवन गौरव.


उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित सन २०१९-२०२० चे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद माजी विभाग प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांना जीवनगौरव पुरस्कार 

 दि. ५ जानेवारी रोजी संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले.

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत दहा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे अकरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात *उत्कृष्ट वार्ता गट* *प्रथम पुरस्का* दैनिक सकाळ चे उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथील बातमीदार अविनाश काळे यांच्या 'शेतमजूरी करुन शिक्षणासाठी घेतला फोन' या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय पुरस्कार वांजरवाडा ता. जळकोट जि.लातूर येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी विनोद गुरमे यांना ' रेणूकाच्या यशाला दु:खा ची किनार 'या बातमीस जेष्ठ संपादिका निर्मलाताई बांगे यांच्या वतीने कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ तिन हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,तृतीय पुरस्कार माजलगाव जि.बिड येथील दैनिक आदर्श गावकरी चे प्रतिनिधी ज्योतिराव पांढरपोटे यांच्या 'मिरची लागवडीतून एकरात चार लाखाचे उत्पन्न ' या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

*शोध वार्ता गट* 

प्रथम पुरस्कार दैनिक पुढारीचे उमरगा जि. उस्मानाबाद येथील प्रतिनिधी शंकर बिराजदार यांच्या 'कुटुंबाच्या सुखदायिनीचेच आरोग्य धोक्यात' या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,व्दितीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे घोणसी ता.जळकोट जि.लातूर येथील प्रतिनीधी हणमंत केंद्रे यांच्या ' राजूने बनवले वायरलेस विद्दुत यंत्र ' या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख ३ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह , तृतिय पुरस्कार बापू नाईकवाडी जि.उस्मानाबाद यांच्या समय सारथी मधील 'गुराळामुळे परिसरातील शेकडो युवकांना रोजगार' या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के , प्रा,शिवशंकर पटवारी लातूर व प्रा. डाॅ.दत्ताहरी होनराव यांनी काम पाहिले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे.

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज