केज प्रतिनिधी
तालुक्यातील केकतसरणी यथे राजमाता जिजाऊ जयंती , युवक दिन कोरो संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. युवकांनी पुढाकार घेऊन अशी शपथ घेतली की, आम्ही बालविवाह करणार नाही आणि गावामध्ये बालविवाह होवू देणार ही नाही . अशी शपथ घेवून .
गावामध्ये महिला अत्याचाराला बळी पडू देणार नाही. काही युवकांनी स्वतः चे विचार व्यक्त केले. अध्यात्मक. विचार न करता सविधनात्मक विचार असावा अशी चर्चा करण्यात आली.
कोरो संघटनेमुळं मिळाली नवचेतना
जिजाऊ जयंती आणि युवक दिनाच अवचैत्य साधून केकतसारणी येथे युवकांनी केला आगळावेगळा उपक्रम ज्यातून गावात होणाऱ्या हिंसा,बालविवाह याला बसेल आळा.
युवकांना कोरो च्या कार्यकर्त्यां कडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा आधार घेऊन गावात हिंसा मुक्त जीवन हा उपक्रम राबण्याचा प्रयत्न सुरू केला.ज्यामद्ये अत्याचार, हिंसा आशा गोष्टीला आळा बसेल असा बनवला युवकांचा गट आणि यामधून त्यांचे ध्येय साध्य करण्याचा विचार ते युवक करत आहेत.
यावेळी कोरो चे कार्यकर्ते अविनाश भाऊ खरात,लक्ष्मणभाऊ हजारे,अनिता खंडागळे, रोहिनि ताई खरात आणि गावातील युवक संघटन उपस्थित होते.

COMMENTS