धर्माबाद (अहमद लड्डा) जवळपास एक कोटीच्या खर्चाने बांधलेल्या धर्माबाद क्रीडा संकुलाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आणि बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण आमदार श्री राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक, प्रलोभ कुलकर्णी, संजय चव्हाण, डॉ पंढरीनाथ थोटे, धर्माबाद तालुका क्रीडा संयोजक अहमद लड्डा, जाकिर खान सर, खेळाडू शब्बीर शेख,गोनारकर सर व बनसोडे सर आणि साजिद अन्सारी सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. श्री चव्हाण यांनी हे क्रीडा संकुल पाहुन समाधान व्यक्त केले आणि कौतुक ही केले.येथे अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत आणि खेळाडू येथे खेळायला यावेत,चांगल्या पद्धतीने खेळावे व या क्रीडा संकुलाची काळजी पण घ्यावी व दुसऱ्या बॅडमिंटन कोर्ट ला येत्या मिटिंगमध्ये पैसे मंजूर करेन असे ही चव्हाण म्हणाले. क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार राजेश पवार यांच्यावर पण माझी नजर आहे, असे म्हणताच सर्व उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. यावेळी व्यासपीठावर आमदार अमर राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण,राष्ट्रवादी चे हरिहरराव भोसीकर, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, सौ पूनमाताई पवार, गंगाधर सेठ गुजराथी, डॉ.कमल किशोर काकाणी,नुसरत कंस्ट्रक्शन चे मालक मोइजसेठ करखेलीकर, नगरध्याक्षा सौ अफजल बेगम व त्यांचे प्रतिनिधी अब्दुल सत्तार सेठ, राजेसाब, व्यापारी महेंद्र पांडे, माजी नगराध्यक्ष व सध्याचे नगरसेवक विनायकराव कुलकर्णी आणि विश्वनाथ पाटील बन्नालीकर, कृषी उत्पन्न बाजार समिति चे संचालक रमेश गौड, भाजपा चे विजय पाटील डांगे, सुनील शिंदे, कॉंग्रेस चे नगरसेवक वर्णी नागभूषण, शहराध्यक्ष ताहेर पठाण, जिल्हा परिषद उपाध्यक्षा पद्माताई रेड्डी सतपालवार, शिवसेनेचे आकाश रेड्डी व संघटक गणेश गिरी, व्यापारी उमेश झंवर, दिनेश सारडा, राजेश सारडा, संचालक गोविंद रोशनगावकर,नगरसेवक निलेश पाटील, माजी नगरसेवक शेख शादुल, व्यापारी प्रकाश गुजराथी, संचालक अशोक वडजे पाटील, संजय गायकवाड आणि ज्येष्ठ खेळाडू अनिल रत्नाळीकर उपस्थित होते. कार्यक्रमात रनिंग, व्हॉलीबॉल आणि ज्युडो कराटे यांचे प्रात्यक्षिक ही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात ज्येष्ठ खेळाडू व क्रीडा संयोजक अहमद लड्डा, पोलिस खेळाडू शब्बीर शेख, दिपाली बड्डावार आणि साजिद अन्सारी यांना सन्माननीय लोकांनी सन्मानित केले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले तर प्रलोभ कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक खेळाडूंनी परिश्रम घेतले, ज्यात शिवा गोस्कुलवाड, शेख सलाउद्दीन, दिपाली बड्डावार, जुनैद आणि रियाझ यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठीं पोलिसांकडून कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
लोहा,15- विद्यार्थ्यांनी उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कंधार तालुका का...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
लोहा,15- विद्यार्थ्यांनी उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कंधार तालुका का...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...

COMMENTS