धर्माबाद (अहमद लड्डा)
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री श्री.अशोकराव चव्हाण यांना धर्माबाद व तालुक्याच्या पदवीधर कर्मचार्यांनी बिनशर्त शासकीय सेवेत सामाउन घेऊन हा प्रश्न कायमचा संपवावा अशी विनंती केली आहे. श्री. चव्हाण रविवारी धर्माबाद दौर्यावर होते, येथे ते क्रीडा संकुल, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह, रिंग रोड आणि रेल्वे उड्डान पुलाचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. ह्यावेळी या कर्मचार्यांनी निवेदन दिले. त्यात असे लिहिले आहे की आम्ही मागील अठरा वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. यासाठी पुन्हा-पुन्हा मोर्चे काढले, निवेदन ही दिले व उपोषणही केले गेले, परंतु आजपर्यंत आम्हाला न्याय मिळू शकला नाही. या कारणास्तव आमच्यावर आणि आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तुमच्या नेतृत्वात दहा टक्के सरकारी नोकरीत आरक्षण शेवटचे वेळी देण्यात आले होते, तुम्ही त्याचे शिल्पकार आहात तुम्हाला सर्व माहिती आहे. पदवीधर अर्धवेळ कर्मचारी मार्गावर नसल्याच्या प्रश्नामुळे अनेक पदवीधर कर्मचार्यांनीही आत्महत्या केली आहे. म्हणून लवकरात लवकर या प्रश्न मार्गी लावणे, अशी विनंती करून या सर्व पदवीधर कर्मचार्यांना विना अट शासकीय सेवेत सामाउन घेण्यासाठी विनंती केली आहे. या निवेदनावर शेषराव धावने, नरसिंग आलूरकर, मो अब्दुल रहीम, संजय भंडारे, संजय रेणगंटवार, प्रकाश सोलंके, नागेश जाधव आणि बार्देवाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS