बेरोजगार दिव्यांगांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकारांना मिठाई वाटून आणि गुलाबाचे फुल देऊन केले नुतन वर्षाचे स्वागत


नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)

कमल फाउंडेशन संचलीत बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली या हि वर्षी दि 1जानेवारी 2021 रोजी नुतन वर्षांच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करत वाहतूक पोलिस.रेल्वे पोलिस.वजीराबाद पोलिस.शिवाजीनगर पोलिस यांच्यासह पत्रकार बांधव यांना मिठाई वाटप करून सर्वांना गुलाबाचे फुल देऊन तसेच मकरसंक्रांतीचे तिळगुळ देऊन नुतन वर्षाचे स्वागत करण्यात आले.यावेळी संबंधित सर्व पोलीस निरीक्षकांनी आणि पत्रकार बांधवांनी बेरोजगार दिव्यांगांच्या या उपक्रमाचे स्वागत केले तसेच या पुढेहि आम्ही सर्व जन आपल्या सोबत कायम असेच पाठिशी खंबीरपणे उभे आहोत आणि आपणास या नवीन वर्षात यापुढे कुठलेच आंदोलन उपोषण करण्याची वेळ येऊ नये आपल्या सर्व न्याय मागण्या याच वर्षी सर्व निकाली लागो अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी राहुल साळवे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले कि पोलिस प्रशासनाला आपला स्वतःचा परीवार बाजूला ठेवून कुठलेही सण.उत्सव - त्योहार असो निवडणुका असो कि दंगली असो यासह आमच्यासह ईतर सर्व सामाजिक संघटनांचे विविध आंदोलने उपोषणे आणि मोर्च्यां असो चोख बंदोबस्त ठेवावा लागतो.या व्यतीरीक्त मार्च २०२० पासुन ते आजवर कोरोना महामारीमुळे संसर्ग वाढु नये यासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करणा-या क्रांतिकारी पोलिसांवर आणि आपल्या निर्भीड लेखणीद्वारे आम्हा दिव्यांगांसह ईतर सर्व घटकांना न्याय हक्क मिळवून देणा-या पत्रकार बांधवांवर जीवघेणे हल्ले होतात हे फार निंदनीय प्रकार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे आणि असे प्रकार यापुढे घडु नये यासाठी गत चार वर्षांपासून आम्ही विविध उपक्रम राबऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा तसेच पोलिस प्रशासन आणि पत्रकार बांधव यांचा दर्जा उंचावण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत असल्याचे राहुल सिताराम साळवे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

या नुतन वर्षांच्या उल्लेखनीय उपक्रमात

राहुल साळवे सह.चंपतराव डाकोरे.आर्यन श्रीमंगले.कार्तिक भरतीपुरम.शिवाजी सुर्यवंशी.अब्दुल माजीद शेख चांद.सय्यद माजीद.नागनाथ कामजळगे.सय्यद आरीफ.सय्यद आतिक.मुंजाजी कावळे.पांडुरंग तांदळवाड.शेख ऊमर.विठ्ठल सुर्यवंशी.राजु ईराबत्तीन.मनोहर पंडित.शेख आलीम.देवेंद्र खडसे.सय्यद हाकिम.हणमंतराव राऊत.विजय चवडेकर.गणेश मंदा.हुसेन खान.विकास साळवे.प्रशांत हणमंते.साहेबराव कदम.संजय सोनुले.गणेश वर्षेवार.सिद्धोधन गजभारे.नागोरे आण्णा.रमेश लंकाढाई.भाऊसाहेब टोकलवाड.अजय गोरे.माधव बेर्जे.विश्वनाथ हंबर्डे यांच्यासह कमलबाई आखाडे.सविता गावते हे सहभागी झाले होते.

टिप्पण्या