सैनिकी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


उदगीर,

श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, कमांडंट कमांडर बी.के. सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के हे उपस्थित होते.

विद्यालयातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख सतीश जगताप यांनी प्रजासत्ताक दिनाविषयीची माहिती दिली. 

प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी. के. सिंह यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी विद्यालयातील अमर जवान स्मारक येथे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


सैनिकी विद्यालयातील एक तुकडी प्रजासत्ताक दिनाबद्दल संचलन करण्यासाठी लातूर येथील क्रीडा संकुल येथे तर दुसरी तुकडी व बॅंड पथक उदगीर येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या मैदानावर जावून त्यांनी उत्कृष्ट संचलन केले.

विद्यालयातील विश्वनाथ दरपुरे व श्रीनिवास एखंडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या