जिला प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्हयातील वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी हट्टा पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर ठाण्याच्या हद्दीत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यातच ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना थारा न देता अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरूच आहे. २९ जानेवारी रोजी हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच सपोनी गजानन मोरे यांनी धडक कारवाई करीत ७ आरोपींना अटक करून 2 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध रेती वाहतुक करणार्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करून ११ लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हट्टा पोलिस ठाण्यात रूजु होताच सपोनी गजानन मोरे यांनी हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायद्याची कडक अमलबजावणी करून कुठेही अनुचीत प्रकार किंवा अवैध धंदे खपुन घेणार नाही असा ईशारा बिट जमादारांना दिला होता. तसेच ठाण्यात येणार्या फिर्यादीला आदरयुक्त वागणुक देवून फिर्याद नोंदवुन घ्यावी अशा सुचनाही ठाण्यातील कर्मचार्यांना दिल्या आहेत. हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणारी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे स्वत: रस्त्यावर उतरून साफ करत सामाजीक बांधीलकी जपली. तसेच हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारेफळ गाव परिसरात एका शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती सपोनी गजानन मोरे यांना समजताच २९ जानेवारी रोजी रात्री उशिरा सदर जुगार अड्यावर कारवाई करीत ७ आरोपींना रंगेहाथ धरून त्यांच्या कडून नगदी २१ हजार ४४० रूपये जुगाराचे साहित्य मोटरसायकल, मोबाईल असा २ लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुर्णा नदिच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ दोन ट्रॅक्टर वर कारवाई करीत चार आरोपींवर घुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ११ लाख रूपायांचा मुद्देमाला जप्त केला आहे. त्यांच्या या दबंग कारवाईने चोरीछूपे अवैध धंदे चालवणारांचे धाबे दनाणले आहेत. सदर कारवाई जिला पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचे सपोनी गजानन मोरे यांनी सांगितले आहे.


COMMENTS