प्राचार्य व्ही. एस. कणसे याना रोटरीचा कृतज्ञता सन्मान


उदगीर । प्रतिनिधी : विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व्ही. एस.कणसे याना शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने कृतज्ञता सन्मान देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डी. जी.रो. हरिशजी मोटवाणी , ए. जी.रो.उमाकांत मदरेवार, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेन्ट्रलचे अध्यक्ष रो.विशाल तोंडचिरकर ,सचिव कीर्ती कांबळे, प्रोजेक्ट चेअरमन शिवा बोळेगावे यांची उपस्थिती होती. प्राचार्य व्ही. एस.कणसे हे उपक्रमशील प्राचार्य म्हणून परिचित आहेत.त्यांना यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे ,नागपूर, लातूर , नळदुर्ग येथील वेगवेगळ्या संस्था ,संघटनेचा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत. कुणबी मराठा मंडळ जिल्हा सदस्य, पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा सदस्य ,उदगीर येथील सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष, जनता विकास परिषद सदस्य,शांतता कमिटीचे सदस्य अशा अनेक पदावर राहून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला .त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

टिप्पण्या