राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.
श्री. पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे. भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे. सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणुक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात, असे श्री. पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे असेही श्री. पाठक यांनी म्हटले आहे.
*चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील*
*निवडणूक शपथपत्राबाबतची याचिका न्यायालयाने निकाली काढली*
भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता ते महसूल मंत्री आणि नंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मारलेली मजल ही काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यामुळेच मला अडचणीत आणण्यासाठी खोटे शपथपत्र दाखल केल्याची तक्रार करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले आहे असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोथरूड विधानसभा निवडणुकीत मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री. अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 (अ) अन्वये दादांच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांतदादां विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर खटला निकाली काढला.
प्रसिध्दीपत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, अशा खोट्या आरोपांची आता सवय झाली आहे. या आरोपांमुळे मानसिक त्रास होतो हे जरी खरे असले तरी अशा कट-कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडून पुन्हा एकदा समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होत
तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन मा. न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने..
1) चंद्रकांतदादांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.
2) तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांतदादा कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.
3) त्याचबरोबर चंद्रकांतदादा ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे निरीक्षण ही न्यायाधीशांनी नोंदवले.
4) तसेच चंद्रकांतदादा यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.
*(मुकुंद कुलकर्णी)
*कार्यालय सचिव*
COMMENTS