क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या विचारांचा जागर जिल्हा परिषदेद्वारे सदैव करण्याचा निर्धार - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

सुट्टी असूनही 100 टक्के महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी नांदेड (जिमाका) दि. 3 :- मह...


सुट्टी असूनही 100 टक्के महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महिलांकडे माणुस म्हणून बघण्याची, तिला शिक्षणाचा प्रवाहात आणून सन्माने उभे करण्याची, तिला सन्माने जगण्याच्या हक्काची जाणीव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी करुन दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी असलेल्या बंदिस्त जोखडातून मुक्त करण्याचे काम अत्यंत जिद्दीने सावित्रीबाईंनी केले. हे कार्य करतांना समाजातील ठराविक वर्गाकडून आलेल्या शेणामातीचे गोळेही तिने अंगावर घेतले. महिलांना स्वाभिमानी व शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही केवळ एक दिवसापूरती साजरी करुन चालणार नाही तर तिने दिलेल्या शिकविणीचे बळ व विचाराचा जागर सदैव करणे गगरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

आज सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एकत्र येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विचारा-विचारांचा जागर करीत वेगळ्या पद्धतीने साजरी केली. जिल्हा परिषदेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या प्रातिनिधीक शाळांतील मुलींना आपल्या भावभावना व सवित्रीबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी यशस्वी वेबनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधला. 

विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये व्याख्यान, चर्चासत्र, भाषण, निबंध लेखन, वक्तृत्व, परिसंवाद, एकांकिका, वेबीनार इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला शिक्षिका, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पालक, विद्यार्थी यांनी वेबिनार मध्ये सहभाग घेतला. नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी व माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानोळा या शाळेतील मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर आधारीत अतिउत्कृष्ट एकांकीका सादर केल्या. यातून महिलांचा व मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी मानले

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
WhatsApp वर ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मिळवा थेट WhatsApp वर Join Channel