हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत ) या संघटनेची हिंगोली जिल्हा महिला कार्यकारणी गठीत करण्यात आली असुन जिल्हाध्यक्ष पदि नैनाताई गिरी तर उपाध्यक्ष पदी कल्पनाताई गिरी यांची निवड गुरूवारी हिंगोलीशहरातील अकोला बायपास परिसरातील पांडुरंग गिरी यांच्या निवासस्थानी करण्यात आली.
हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी, राज्य महामंत्री संदीप गोसावी, सह महामंत्री उर्मीला गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांच्या सुचने वरून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष महेंद्र पुरी यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हाध्यक्ष विठ्ठल गिरी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश पुरी, यांनी गुरुवारी हिंगोली जिल्हाची महिला कार्यकारणी गठीत करून नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ समाजसेवक तथा आदर्श शिक्षक पांडूरंग गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकारणीत
महिला जिल्हाध्यक्षा- नैनाताई गिरी
जिल्हा उपाध्यक्ष- कल्पना गिरी
जिल्हा महामंत्री- राधाबाई गिरी
सह महामंत्री- वर्षाताई गिरी
कार्याध्यक्ष- आशाताई गिरी
कोषाध्यक्ष- सिताताई पुरी
जनसंपर्क प्रमुख- सिमाताई अशिष पुरी यांची निवड करण्यात आली असुन
सदस्य- होकर्णाबाई पुरी, सिमा पुरी, वर्षा गिरी, सावित्रीबाई पुरी, दिपाली गिरी यांच्यासह ईतर गोसावी महिलांचा समावेश आहे यावेळी मोठ्या संखेने महिलांची उपस्थिती होती
त्यांच्या निवडीबद्दल गोसावी समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS