*सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वानटाकळी येथील अनाथआश्रमांला व माणूस प्रतिष्ठानला आर टी आय पदाधिकार्यांची सदिच्छा भेट.*

 मस्साजोग प्रतिनिधी -परळी तालुक्यातील वानटाकळी येथील माणूस प्रतिष्ठानला* व* अनाथआश्रमांला माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ औरंगाबाद विभा...


 मस्साजोग प्रतिनिधी -परळी तालुक्यातील वानटाकळी येथील माणूस प्रतिष्ठानला* व* अनाथआश्रमांला माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधि सोपान पवार साहेब व पत्रकार अनंत जाधव व अशोकजी उंदरे साहेब, अनिल दादा देशमुख , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ औरंगाबाद विभागाचे संपर्क प्रमुख संजयजी काकडे साहेब यांनी दिनांक ३ जानेवारी रविवार रोजी वानटाकळी येथील माणूस प्रतिष्ठानला पुणे येथील भिडे वाड्यात मुलींन साठी पहिली शाळा सुरू* *करणार्‍या विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला. अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वानटाकळी येथील माणूस प्रतिष्ठानला व अनाथ मुलांमुलीच्या अनाथ आश्रमाला सदिच्छा भेट दिली असता माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधि सोपान पवार साहेब यांनी सावित्रीबाई फुले कोण होत्या व त्यांनी देशाच्या समाजहितासाठी व महिलांसाठी काय कार्य केले यांच्या बद्दल अनाथ आश्रमातील अठरा पगड जातीतील मुलांमुलीना माहिती व विविध विषयांवर मार्गदर्शन केले व माणूस प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार अनंत जाधव माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधी सोपान पवार साहेब , अशोकजी उंदरे साहेब , अनिल दादा देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित अनाथ आश्रमातील मुले-मुली व माणूस प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

*संस्थापक शरदजी झरे यांनी मदत मिळण्यासाठी लिहिलेले पत्र

माणूस प्रतिष्ठान* या संस्थेच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यातलं तूटतं चाललेलं नात सृदृढ करण्यासाठी शरद झरे यांनी नवा सामाजिक प्रवास सुरू 

केलेला आहे. व त्यांचे मुळ गाव मु.पो.वडगांव ता.निलंगा जि.लातूर.असुन ते अगदी तरूण वयात गावचा सरपंच म्हणून लोकाभिमूख कार्य करण्याचा प्रमाणिक प्रयत्न शरद झरे यांनी केला. काही काळ हे पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास होते. सद्या मु.पो.वानटाकळी ता.अंबाजोगाई जि.बीड येथे नव्या सामाजिक कार्यांचा आरंभ त्यांनी केला आहे.


या पूर्वी ही झरे यांनी आपणास माझं ऑक्सिजन ग्रुपंचं कार्य, निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी काढलेली महाराष्ट्र व्यापी सायकल यात्रा व पुणे शहरांच्या आसपासच्या डोंगरवनात 

लाखो बीया रोपणातून वनराजीच्या संवर्धनाचं केलेलं कार्य या विषयी आपणास फेसबूक व व्हाटसॲप सारख्या समाजमाध्यमातून कळवलेलं आहेच. कोरोना संसर्ग काळात पुण्यात *लातूरची माणसं* या नावाने एक ग्रुप बनवून झरे यांनी लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड तसेच महाराष्ट्रातील अन्य भागातील रोजगारांसाठी पुण्यात आलेल्या व पुणे येथे 

वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ३००० गरीब कुटुंबियांना समाजातील दानशूरांच्या मदतीने रेशन कीट, अन्न धान्य व अन्य किराणा साहित्याचे वाटप केले.व

पुणे ते लातूर हा महामार्ग म्हणजे कडक उन्हातला प्रवास. सात आठ तासांच्या या दीर्घ प्रवासात दहा मिनटं सावलीला थांबावं असे एकही झाडं या महामार्गावर 

नाही.म्हणून हा रस्ता एक लाख वृक्ष लावून वनराजीने हिरवेगार असा ग्रीन सुपर वे* करायंचा आणि या मार्गावरील प्रवास सुखद व आल्हादायक* करायचा हे शरद झरे ‌सरांनच  

स्वप्न आहे.या प्रकल्पावर काम सुरू आहे, पण कोरोना संसंर्गामुळे व प्रशासनांच्या विनंतीमुळे हा प्रकल्प एक वर्ष पुढे ढकलला आहे.

सद्या मु.पो.वानटाकळी* ता.परळी जि.बीड येथे माणूसकीच्या झाडांच रोपण व झाडांतली माणूसकीच संवर्धन करणासाठी तसेच भटक्या विमुक्तांच्या 

मुलांमधील पारंपारिक क्रीडा प्रतिभा विकसीत करून त्यांच्यातल्या स्वाभाविक खेळाडूवृत्तीला आकार देण्यासाठी आश्रमाच्या कामाला सुरुवात केली आहे. हे संगळं सामाजिक कार्य करताना या कामात स्वतःला पूर्णवेळ झोकून देण्याचा संकल्प शरद झरे यांनी केला आहे. म्हणून आज रोजी शरद झरे यांच्याकडे काय आहे, आणि काय नाही हे 

आपणास मोकळ्या मनानं सांगितलं पाहिजे.१.आज झरेकडे फक्त एक *मोठ्ठं स्वप्न* आहे

२.आज झरे यांच्याकडे फक्त *मोठा निर्धार* आहे.३.आज झरे यांच्याकडे*सळसळत तारुण्य* व धडधाकट शरिरयष्टी आहे.४.आज झरे यांच्याकडे*माणूस प्रतिष्ठाण* नावाची शासनमान्य रजिस्टर्ड झालेली एक संस्था आहे.व

.वानटाकळी येथे अनाथाआश्रम व नर्सरी उभारण्यासाठी संस्थेला दान मिळालेला जमीनीचा छोटा तूकडा* आहे.

 झरे यांच्याकडे वंचित घटकातील बालकासांठी व झाडं यांच्यासाठी आगळं वेगळं कार्य करण्याची अंतःप्रेरणा* आहे.

वया पलिकडे काही सुद्धा नाही.

पैसा म्हणालं तर एक फुटकी कवडी सुद्धा नाही.

पण सोबत तुमच्या सारख्या निर्मळ व संवेदनशील मन असणाऱ्या हजारो माणसांच्या दातृत्वशक्तीवर माझा संपूर्ण विस्वास आहे.*

तुमच्या विश्वासासाच्या बळावरच मी हे समाजसेवेचं शिवधनुष्य उचललं आहे.आजचा काळ हा कोरोना संक्रमणांचा व आर्थिक अरिष्टांचा काळ आहे. मला याची नम्र जाणीव आहे.पण आपण माणूस असण्याची *परिक्षा* होण्याचा काळ व आपण माणूस म्हणून *स्वतःला सिद्ध* करण्यासाठीचा सर्वांत योग्य काळ हा *संकटकाळ* हाच असतो.मी जे करतो आहे ते कार्य माझे आहे, तुमचे आहे, समाजाचे आहे आपल्या सर्वांचेच आहे.सर्वांच्या भल्यांचे आहे. *थोडक्यात हे आपलं काम आहे.*

या आपल्या कामात मला आपल्याकडून मदत हवी आहे. हो *आर्थिक मदत* हवी आहे.

आपल्याकडून पुढील एक वर्षभर *महिना २०० रूपये* एवढी *देणगी* हवी आहे.

तुम्ही एकदाचं देणार असालं तर मला लगेच वार्षिक देणगी म्हणून १०००/- रूपये दिले तर ते माझ्यासाठी खूप आहेत. आपल्यापैकी कोणी एकदाच पाच -दहा हजार 

किंवा अधिक रक्कम देऊ इच्छित असालं तर स्वागतच आहे.

रक्कम छोटी असो की मोठी प्रत्येक मदत आमच्या साठी *अतिशय अमूल्य व अनमोल* आहे.तुम्ही मदत दिली की देणगी मिळाल्याची पावती मी आपल्या व्हॉटसॲप वर त्वरीत पाठवून देईन.तुम्ही सगळयांनी दिलेल्या आर्थिक मदतीचा प्रत्येक तीन महिन्यांनी कोठे कसा व केव्हा खर्च केला याचा प्रत्येक महिन्याला संपूर्ण जमा -खर्चांचा ताळेबंद हिशोब आपणास 

व्हॉटस ॲप वर पाठवला जाईल आपल्या पैशातून काय काम केलं. आपल्या पैशाचा कसा उपयोग केला ते सगळं कळवलं जाईल.आपल्या दिलेल्या देणगीच्या पैशाचे वार्षिक ऑडिट रिपोर्ट आपणास पाठवला जाईल.*वर्षभरात केलेल्या सामाजिक कामांच मूल्यांकन करून त्यांचाही अहवाल आपणास पाठवला जाईल.*आता तातडीने वानटाकळी येथे वड पिंपळ,उंबर जाभूळ अशा मोठ्या झाडांची रोपे तयार करण्याची नर्सरी सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. या नर्सरीत रोपे तयार करून वर्षभरात

या उजाड परिसरात एक लाख झाडं लावण्यांचा संकल्प आहे.

सद्या वानटाकळी येथे संस्थेच्या अनाथआश्रमांचे निवारा शेड उभारण्यासाठी मदतीचा अपेक्षा आहे.*आपण दिलेल्या प्रत्येक रूपयांचा सद्या लगेच अनाथआश्रम व वक्षसंवर्धन यासाठी सद्‌उपयोग केला जाईल. 

वृक्षमित्र सुधाकर देशमुख सर

तुमच्या संवदेनशीलतेला साद घालत, मी ओंजळ करून मदतीची प्रतिक्षा करीत आहे.*

*देणगी पाठवण्यासाठी तपशील*

Name of Account : MANUS PRATISHTHAN

A/C No.083911100005011

BANK: ANDHRA BANK

Branch : LATUR

IFSC Code : ANDB0000839

*अधिक माहितीसाठी संपर्क* - शरद झरे , 

 Mob: 8805621337

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel