माजलगाव/प्रतिनिधी
आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव ही संस्था गेल्या नऊ वर्षापासून माजलगाव शहरांमध्ये व परभणी ,पुणे अंबाजोगाई ,तेलगाव या ठिकाणी कार्यरत आहे. संस्था केवळ तांत्रिक पद्धतीने आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून व्यवसायाच्या पलीकडचं एक नातं सर्वांची जोडण्याचा आमचा नित्य प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही दरवर्षी महिलांचे प्रबोधन व्हावे व निसर्गाशी एक नातं असावं या हेतूने महिलांना आर्थिक साक्षरता या विषयावर प्रबोधन आणि वृक्षारोपणला मदत व्हावी म्हणून वृक्षांचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे सत्कार वाढदिवस त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणारे व्यापारी अधिकारी कर्मचारी शेतकरी यांना दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून विविध पुरस्कार दिले जातात तसेच हराच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये संस्थेचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून सहकार्यांनी मदत नेहमीच करत आलेली आहे आज असंख्य महिलांची उपस्थिती होती याकामी आमच्या महिला कर्मचारी सौ सीमा जोशी ज्योती साळवे मीनाक्षी राऊत सीमा मुळे शितल शेळके व ज्योती धुमाळ यांनी मदत केली

COMMENTS