माजलगाव/प्रतिनिधी
श्रीराम मंदिर निर्माण संकलन अभियान शोभा यात्रा शेलापुरी येथे टाळ,मृदंग गजरात दिंडी काढण्यात आली या शोभा यात्रेत लहान मुलं, महिला, वृद्ध, तरुण यांचा मोठा सह भाग होता श्रीराम मंदिर निर्माण संकलन अभियान शोभा यात्रा सकाळी 8 वाजता हनुमान मंदिरात श्रीराम च्या प्रतिमेचे पूजन करून शेलापुरी गावात शोभा यात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेत महिलांनी तुळशी वृंदावन, लहान मुलीने डोक्यावर कळस, मृदंग टाळ च्या गजरात दिंडीची सुरूवात झाली व शोभा यात्रेचे विसर्जन हनुमान मंदिरात करण्यात आली. यावेळी दिंडीत प्रसाद हिवरकर, भास्कर गिरी, निवृत्ती सुरवसे, त्र्यंबकराव शेंडगे, निवृत्ती शेंडगे, भीमराव मोरे, भिमराव सुरवसे, सोपानराव सुरवसे, महादेव काळे, भागवत वाघमारे, युवराज ठोंबरे, परमेश्वर शेंडगे, गोविंद सुरवसे, महिला, लहान मुलांचा मोठी उपस्थिती होती.

COMMENTS